अखेर मेगा भरतीला ग्रीन सिग्नल ; १५ एप्रिलपासून मेगा भरतीला होणार सुरुवात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । राज्यातील शासकीय विभागामधील रिक्त पदाची संख्या आता दोन लाखावर पोहोचली आहे.या पार्श्वभूमीमुळे रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही मेगा भरती १५ एप्रिल पासून होणार आहे.
एक लाख एक हजार पदांची आरक्षण पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने
राज्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला.

सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलकडे अर्ज केले. मात्र, मेगाभरतीला अधिक रक्कम अडकून पडली. आता महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाआयटी विभागाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे.

महाआयटी विभागातर्फे ‘आरएसपी’ (रिक्वेस्ट ऑफ प्रपोजल) प्रसिद्ध केली जाणार असून देशातील एका सक्षम अशा एजन्सीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार १५ एप्रिलपर्यंत राज्यातील शासकीय मेगाभरतीसाठी एक एजन्सी नियुक्ती केली जाणार आहे. तत्पूर्वी, राज्याच्या सामान्य प्रशासनाकडून एक परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामध्ये महाभरतीची प्रक्रिया कशी राहणार, त्यावर नियंत्रण कोणाचे असणार याबद्दल स्पष्टीकरण दिले जाणार आहे.

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”