Government Megabharti : बाप्पा पावले!! दीड लाख तरुणांना मिळणार शासकीय नोकऱ्या; अजित पवारांची घोषणा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील बेरोजगार तरुणांना दिलासा (Government Megabharti) देणारी बातमी हाती आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या (State Government) विविध विभागात लवकरच दीड लाख पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या भरतीमुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

तब्बल दीड लाख पदे भरणार
आज माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, मी काल दिवसभर राज्यांतील नोकरभरती संदर्भातील बैठकीत होतो. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले (Government Megabharti) आहेत. आता लवकरच राज्यातील आरोग्य, शिक्षण यासह अनेक विभागात 1.5 लाख नोकरभरती होणार आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या पदांवरील कर्मचारी निवृत्त होण्यापूर्वी किमान तीन महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल. याबाबत अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत.
दरम्यान गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवरून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. परंतु या सगळ्या घडामोडी राज्यात सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना ट्रोल केले जात होते. त्यानंतर आज त्यांनी काल आपण नोकरभरती संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत होतो; अशी माहिती दिली आहे.

राष्ट्रीय लघु उद्योगकडून पदभरती सुरु (Government Megabharti)
नुकतीच राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने देखील असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. हे मंडळ इच्छुक उमेदवारांकडून असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी अर्ज मागवून घेत आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. ज्या उमेदवारांना या पदभरतीची आणखीन माहिती जाणून घ्यायची आहे त्यांनी NSICच्या अधिकृत संकेतस्थळाला https://www.nsic.co.in/ भेट द्यावी.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com