Government Job : राज्य शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 पदांवर भरती; पात्रता फक्त 10 वी पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना (Government Job) आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून “शिपाई ” (गट-ड) संवर्गातील एकूण 125 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ पासून उपलब्ध होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

संस्था – नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – शिपाई
पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 20 सप्टेंबर 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज फी –
अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
राखीव प्रवर्ग – रु. 900/-
अर्ज फी – (Government Job)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs. 15,000/- ते 47,600/- दरमहा
वय मर्यादा –
1. उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
2. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.)
3. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
4. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयो मर्यादेतील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक (Government Job) वरून अर्ज सादर करायचा आहे.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज २० सप्टेंबर २०२३ पासून सुरू होतील.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (लिंक 20 सप्टेंबरपासून सुरु) – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com