Google India Jobs : खुषखबर!! Google भारतात करणार ‘या’ पदांवर नवीन भरती; बघा डिटेल्स

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । IT क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा (Google India Jobs) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.  जगातील नामांकित कंपनी असलेल्या गुगलने भारतात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची भरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गुगलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असलेले सर्व उमेदवार पात्रतेनुसार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
असं असेल जॉब प्रोफाईल (Google India Jobs)
‘सॉफ्टवेअर इंजिनीअर 3 गुगल नेस्ट’ या पदावर काम करणाऱ्या उमेदवारावर प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड लिहिण्याची जबाबदारी असेल. इतर डेव्हलपर्सनी लिहिलेल्या कोडचा रिव्ह्यू घेणं, त्याबाबत फीडबॅक देणं, डिझाईनच्या रिव्ह्यूबाबत सहकारी व भागधारक यांच्याशी चर्चा करणं किंवा चर्चांचं नेतृत्व करणं, दस्तऐवजीकरणामध्ये सहभाग घेणं, तसंच उत्पादनाबाबतचे अपडेट्स व ग्राहकांचे अभिप्राय यावर आधारित माहिती तयार करणं अशा पद्धतीच्या जबाबदाऱ्या या उमेदवाराला पार पाडाव्या लागतील. त्यासाठी उमेदवाराकडे किमान पात्रता कोणती असावी, तसंच कोणत्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिलं जाईल, याबाबत कंपनीनं माहिती दिली आहे.

आवश्यक पात्रता
1. या क्षेत्रातली पदवी किंवा त्या दर्जाचा समान प्रात्यक्षिक अनुभव.
2. एक किंवा त्यापेक्षा अधिक प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा 2 वर्षांचा अनुभव किंवा अ‍ॅडव्हान्स
3. डिग्रीसह एका वर्षाचा अनुभव. (Google India Jobs)
4. डेटा स्ट्रेक्चर्स किंवा अल्गोरिदम्समध्ये 2 वर्षांचा अनुभव.
5. कम्प्युटर सायन्समधली मास्टर्स डिग्री किंवा पीएचडी असेल तर उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल.
6. सॉफ्टवेअर इंजिनीअर 3, सिक्युरिटी/प्रायव्हसी, गुगल क्लाउड
7. प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड लिहिणं यासह इतर सर्व जबाबदाऱ्या गुगल नेस्टच्या पदाप्रमाणेच असतील.

सॉफ्टवेअर इंजिनीअर, डेव्हलपर टूल्स
या पदासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला कंपनीमधल्या व बाहेरील व्यक्तींसाठी सूचनात्मक दस्तऐवजीकरण करावं लागेल. तसंच इंजिनीअर्सनी तयार केलेली माहिती तपासणं, संपादित करणं या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. इतर डेव्हलपर्सनी लिहिलेल्या कोडचा रिव्ह्यू घेणं, त्याबाबत फीडबॅक देणं, दस्तऐवजीकरणामध्ये सहभाग घेणं, तसंच उत्पादनाबाबतचे अपडेट्स व ग्राहकांचे अभिप्राय यावर (Google India Jobs) आधारित माहिती तयार करणं, ट्रायएज प्रॉडक्ट किंवा सिस्टीममधल्या समस्यांचं विश्लेषण करून त्यांचं निराकरण करणं, हार्डवेअर नेटवर्क, दर्जा किंवा सर्व्हिस ऑपरेशन्सवर त्याचा होणारा परिणाम तपासणं या काही जबाबदाऱ्या या पदावर काम करणाऱ्या उमेदवाराकडे असतील.
आवश्यक पात्रता
1. कम्प्युटर सायन्समधली पदवी किंवा समान दर्जाचा अनुभव
2. प्रोग्रामिंग लँग्वेजेस (उदा. C++, Java) डेव्हलपमेंटमध्ये 5 वर्षांचा अनुभव
3. इंजिनीअर्स किंवा डेव्हलपर्ससाठी दस्तऐवजीकरणाबाबत किंवा संशोधनाबाबतचा अनुभव
4. परफॉर्मन्स अ‍ॅनालिसिस आणि ऑप्टिमायझशनचा अनुभव असल्यास प्राधान्य (Google India Jobs)
5. अ‍ॅक्सेसिबल टेक्नॉलॉजिज विकसित करण्याचा अनुभव असल्यास उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल.
6. एम्बेडेड सिस्टिम्सचं ज्ञान असलेल्या, तसंच वेगानं बदलणाऱ्या वातावरणात प्रगती करण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com