करिअरनामा ऑनलाईन । भारतवासी दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक (GK Updates) दिन अपूर्व उत्साहात साजरा करतात. यावर्षी आपण आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. याचे औचित्य साधून दरवर्षी राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्यदिव्य परेड काढली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल इत्यादींच्या विविध रेजिमेंट्स सहभाही होतात. आज आपण प्रजासत्ताक दिन फक्त 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो याबद्दल सविस्तर महिती जाणून घेणार आहोत.
26 जानेवारी 1950० रोजी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 26 जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.
सन 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये (GK Updates) सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन 26 जानेवारीलाच साजरा केला जात होता. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले आणि 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (GK Updates) यांनी तयार केला आहे. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर, समितीच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी 26 जानेवारी रोजी तो देशात लागू करण्यात आला.
26 जानेवारीचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी त्याच दिवशी भारताला लोकशाही ओळख देण्यात आली. संविधानाच्या अंमलबजावणीनंतर, आधीपासून अस्तित्वात असलेला ब्रिटीश कायदा भारत सरकार कायदा (1935) भारतीय राज्यघटनेद्वारे भारतीय शासन दस्तऐवज म्हणून बदलण्यात आला. म्हणूनच दरवर्षी आपण भारतीय 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
अन् भारत प्रजासत्ताक देश बनला (GK Updates)
26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यानंतर बरोबर 6 मिनिटांनी म्हणजेच 10 वाजून 24 मिनिटांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या दिवशी, डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच (GK Updates) राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले, जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
असा असतो प्रजासत्ताक दिन सप्ताह
प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे 24 जानेवारीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या नावाच्या घोषणेने सुरू होतो. मात्र यावेळी त्याची सुरुवात 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून झाली आहे. आणि 25 जानेवारीच्या संध्याकाळी राष्ट्रपती (GK Updates) राष्ट्राला संबोधित करतात. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यादरम्यान दिल्ली येथे राजपथावर परेड काढली जाते. 27 जानेवारी रोजी, पंतप्रधान परेडमध्ये सहभागी झालेल्या NCC कॅडेट्सशी संवाद साधतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com