करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की हत्तीच्या दातांची (GK Updates) तस्करी देश विदेशात मोठ्या प्रमाणावर होत असते. यासाठी हत्तींना मारुन टाकले जाते. पण प्रश्न असा पडतो की हत्तीचे दात विकून नक्की किती पैसे मिळतात, की ज्याच्या लोभापोटी शिकारी इतके क्रूर बनतात. तर जाणून घेवूया…
आपण लहानपणापासून ऐकत आहोत की हस्तिदंताची किंमत अधिक असते. पण हत्ती दंत (Ivory) इतके महाग का आहेत? असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाजारात याला इतकी मागणी का आहे? वास्तविक पाहता हस्तिदंताचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. गळ्यात घालण्यासाठीचे हार, मनगटात घातल्या जाणाऱ्या बांगड्या हस्तिदंतापासून तयार केल्या जातात. या दागिन्यांची किंमत हजारोंमध्ये असते.
स्टेटस सिम्बॉल (GK Updates)
हस्तिदंताच्या इतक्या महाग विक्रीमागे समाजातील बडे लोक देखील जबाबदार आहेत. खरं तर उच्चभ्रू लोकांमध्ये हस्तिदंत हा स्टेटस सिम्बॉलचा विषय आहे आणि त्यामुळेच ते इतके महाग विकले जातात.
दागिन्यांची क्रेझ
जुन्या काळातही राजघराण्यातील लोकांमध्ये हस्तिदंतापासून बनवलेल्या दागिन्यांची क्रेझ होती, त्यामुळे तेव्हाही या दागिन्यांना खूप मागणी होती. बर्याच ठिकाणी हस्तिदंत हा सामान्य संस्कृतीचा एक भाग होता.
श्रध्दा आणि अंधश्रध्दा
धार्मिक कारणांमुळे आणि अंधश्रद्धेमुळेही हस्तिदंताला मोठी मागणी आहे. हिंदूंचं दैवत असणाऱ्या श्री गणपती बाप्पाला हत्तीच्या रूपात दाखवण्यात आलं आहे, ज्यामध्ये हस्तिदंताचे दात बाहेर येताना दिसतात.
मात्र, हस्तिदंताचा व्यापार बेकायदेशीर आहे. यासंबंधीचा व्यवसाय केल्यास ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ कलम 9 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाते.
किती आहे किंमत?
जर हस्तिदंताच्या किंमतीबाबत सांगायचं तर याची काही निश्चित किंमत नाही. पण हे नक्की आहे की, ही वस्तू खूप महाग आहे. काही वर्षाआधी पश्चिम बंगालमध्ये 17 किलो हस्तीदंताची (GK Updates) तस्करी पकडण्यात आली होती. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साधारण 1 कोटी 70 लाख रूपये अंदाजे ठरवण्यात आली होती. म्हणजे यावरून अंदाज लावू शकता की, हस्तीदंताची एका किलोची किंमत 10 लाख रूपये असू शकते. एक्सपर्टनुसार, हस्तीदंताचा जास्त वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. गळ्यातील हार, बांगड्या, शर्टचे बटन यापासून तयार केले जातात. खासकरून श्रीमंत परिवारांमध्ये याची जास्त डिमांड असते.
जुन्या काळात राजघराण्यांमध्ये हस्तिदंताला (Ivory) खूप डिमांड होती. हिंदू लोकांमध्ये हत्तीच्या मुखाला गणेशाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे लोक हस्तीदंत घरात ठेवणं पसंत करत होते. पण हळूहळू हे इतकं वीभत्स झालं की, हत्तींचा यासाठी जीव घेतला जाऊ लागला. अनेक देशांमध्ये हत्तीचे दात काढण्यावर बंदी आहे. पण तरीही काही लोक हत्तींचा जीव घेऊन त्यांच्या दातांची तस्करी करतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com