GK Updates : तुमच्या शरीराचा कोणता भाग सर्वात जास्त उष्ण आहे? मुलाखतीत विचारतात असे गोंधळात टाकणारे प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: मोर हा अंडी न घालणारा पक्षी आहे, मग मोरांचा जन्म कसा होतो?
उत्तरः मादी मोर अंडी घालते नर मोर अंडी घालत नाही.
प्रश्न 2: गरम झाल्यावर गोठणारी गोष्ट कोणती?
उत्तर: अंडी (GK Updates)
प्रश्न 3: तुमच्या शरीराचा कोणता भाग सर्वात उष्ण आहे?
उत्तरः ज्या भागात सर्वाधिक रक्त असते तो भाग जास्त उष्ण असतो.
प्रश्न 4: महिन्यातून एकदा काय येते आणि 24 तास पूर्ण झाल्यावर निघून जाते ते नाव सांगा?
उत्तर: तारीख
प्रश्न 5: सलग तीन दिवसांची नावे सांगा, परंतु त्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार यांचा समावेश नसावा?
उत्तरः काल, आज आणि उद्या.

प्रश्न 6: तुमचा आवडता अभिनेता कोण आहे?
उत्तर: उमेदवार त्याच्या आवडीनुसार याचे उत्तर देऊ शकतो. लक्षात ठेवा की त्या अभिनेत्याच्या चित्रपटाबद्दल देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून प्रतिसादात काहीही बोलू नका. (GK Updates)
प्रश्न 7: मानवी शरीराचा कोणता भाग दर दोन महिन्यांनी बदलतो?
उत्तर: भुवया
प्रश्न 8: माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तरः डॉ.अबुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम
प्रश्न 9: हवेशिवाय पृथ्वीवर काय होईल? (GK Updates)
उत्तर: हवेत 78% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजन असते. नायट्रोजन वायू वस्तूंचे जलद जळण्यापासून संरक्षण करते. नायट्रोजनशिवाय, झाडे आणि वनस्पती नष्ट होतील, ज्यामुळे मानवांचे जगणे अशक्य होईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com