करिअरनामा ऑनलाईन । विविधतेने नटलेला देश म्हणून (GK Updates) जगभरात भारताची ओळख आहे. भारतातील प्रत्येक राज्यात तुम्हाला विविध संस्कृती पाहायला मिळतील. भारतातील प्रत्येक शहराची स्वतःची एक खास ओळख आहे. जयपूरला ‘पिंक सिटी ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते. पण आज भारतातील ‘ब्लू सिटी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हे शहर खरोखर खूपच सुंदर आहे. एका नजरेतच या ठिकाणचे सौंदर्य खुलून दिसते. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी या शहराचे सौंदर्य मनमोहक असते. भारतातील या शहराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. भारतातील ‘ब्लू सिटी’ कोणत्या शहराला म्हणतात हे पाहूया…
‘ब्लू सिटी ऑफ इंडिया’
भारताचे ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखले जाणारे जयपूर शहर राजस्थान राज्यात आहे आणि याच राज्यात भारताचे ‘ब्लू सिटी’ म्हणून ओळखले जाणारे शहर देखील आहे. या शहराचे नाव आहे ‘जोधपूर’. हे खरं आहे; जोधपूरला भारताची ‘ब्लू सिटी’ म्हटले जाते. जोधपूर हे राजस्थानमधील एक सुंदर शहर (GK Updates) आहे, जे त्याच्या रंगामुळे खूप प्रसिद्ध आहे. सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी जेव्हा मावळतो तेव्हा या शहराचे सौंदर्य शिखरावर असते. जोधपूरला सूर्यनगरी म्हणूनही ओळखले जाते, कारण देशातील इतर शहरांपेक्षा या शहरात सूर्य जास्त काळापर्यंत आकाशात दिसतो.
देशातील सर्वात जुने हे शहर (GK Updates)
‘ब्लू सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सुंदर शहराची स्थापना राव जोधा यांनी सुमारे 558 वर्षांपूर्वी केली होती. राव जोधा हे राठोड समाजाचे प्रमुख होते आणि 1459 मध्ये त्यांनी हे शहर शोधून काढले. राव जोधा जोधपूरचा 15वा राजा होता.
का म्हणतात ‘ब्लू सिटी’?
जोधपूरला ‘ब्लू सिटी’ म्हणण्यामागचे कारण म्हणजे येथील घरे. या शहरातील सर्व घरे निळ्या रंगात रंगवली आहेत. राजवाड्यांमध्येही फक्त निळ्या रंगाचे (GK Updates) दगड वापरले जातात. वाळवंटाच्या मध्यभागी वसलेले हे शहर पूर्वी मारवाड म्हणून ओळखले जात असे.
निळा रंगच का?
या शहरातील घरांवर निळा रंग देण्याचे मुख्य कारण म्हणजे या वालुकामय शहरातील भीषण उष्मा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी (GK Updates) येथील घरांना निळा रंग दिला आहे. हे शहर दुरून पाहिल्यास संपूर्ण निळ्या रंगात न्हाऊन निघाल्यासारखे वाटते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com