करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा ही सर्वात अनिश्चित परीक्षा (GK Updates) मानली जाते. या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील याची कल्पना करणे कठीणच. UPSCची परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. मुलाखतीत व्यक्तिमत्व चाचणी संदर्भातील प्रश्न विचारले जातात. मुलाखतीत चांगली कामगिरी केल्यास निवड होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला MPSC तसेच UPSC च्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते; आणि तुमच्या ज्ञानात भर पडू शकते. चला तर मग पाहूया…
1. चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता?
उत्तर – (GK Updates) 1971 मध्ये 6 फेब्रुवारी रोजी अपोलो -14 ने चंद्राच्या पृष्ठ भागाला स्पर्श केला होता. या मिशनवर गेलेले अंतराळवीर एलन शेफर्ड गोल्फ खेळाडू होते. ते या मिशनवर आपल्यासोबत गोल्फ स्टिक आणि गोल्फचे चेंडूदेखील घेऊन गेले होते. त्यामुळे चंद्रावर पहिल्यांदा गोल्फ हा खेळ खेळला गेला आहे.
2. गुडघ्याच्या पॅडचे शास्त्रीय नाव काय आहे?
उत्तर – गुडघ्याच्या पॅडचे शास्त्रीय नाव पटेला आहे.
3. असे कोणते फूल आहे ज्याचे वजन 10 किलोपर्यंत आहे?
उत्तर – रेफ्लेसिया. (रेफ्लेशिया फुल मुख्यत्त्वे मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आढळते)
4. पकोडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
उत्तर – पकोडाला इंग्रजीमध्ये Fritters म्हणतात. हा शब्द सर्व प्रकारच्या पकोडासाठी वापरला जातो, फक्त त्यापुढे आपल्याला बटाटा किंवा कांदा यासारखे इंग्रजी नाव लिहावे लागेल जसे की Potato Fritters Or Onion Fritters
5. भारतात असे कोणत्या प्रकारचे भोजन आहे, जे कोळशावर शिजवले जाते?
उत्तर – तंदूरी खाद्य पदार्थ कोळशावर शिजवले जातात.
6. झोपेतच स्वप्ने का पडतात? (GK Updates)
उत्तर – वैज्ञानिक संशोधनानुसार, प्रत्येक व्यक्ती झोपेमध्ये किमान दोन ते तीन वेळा स्वप्न पाहते. त्या व्यक्तीला काही स्वप्ने लक्षात राहतात, तर काही स्वप्नांचा विसर पडतो. झोपेवेळी व्यक्तीची जी मानसिक स्थिति असते, त्याचसंबंधी त्या व्यक्तीला स्वप्ने दिसतात.
7. कोणती नदी आपला रंग बदलते?
उत्तर – या नदीचे नाव कॅनो क्रिस्टल्स असून ही नदी कोलंबियामध्ये वाहते. या नदीचे वैशिष्ट्य असे की ही नदी प्रत्येक हंगामामध्ये आपला रंग बदलते.
8. टीपू सुलतान कोणत्या युद्धात शहीद झाले?
उत्तर – टिपू सुलतान यांच्या कारकिर्दीत तीन मोठी युद्धे झाली आणि तिसऱ्या युद्धात त्यांना शहीदत्व मिळाले.
9. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते आहे?
उत्तर – चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय असून 17 एप्रिल 2013 रोजी ‘भारताचे राष्ट्रीय पेय’ म्हणून चहाची घोषणा करण्यात आली.
10. सौरमंडलचा जनक कोणाला म्हटले जाते? (GK Updates)
उत्तर – सूर्याला सौरमंडलचा जनक म्हटले जाते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com