करिअरनामा ऑनलाईन । MPSC, UPSC अथवा कोणतीही स्पर्धा परीक्षा (GK Updates) देताना चालू घडामोडी माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या आधी काही दिवस चालू घडामोडीवर एक झक्कास लेटेस्ट पुस्तक घेईन आणि खूप अभ्यास करीन वेळेवर, तेव्हाचं तेव्हाच लक्षात राहील; हे काय आत्तापासून टेन्शन घेत बसायचं! अशा समजात तुम्ही असाल तर हा मोठा गैरसमज लगेच दूर करा; कारण जेव्हा जनरल स्टडीज चा पेपर हाती येईल तेव्हा नक्कीच तुमचं डोकं एकदम काम करायचं बंद होईल आणि काय करू आणि काय नको असं वाटेल. त्यावेळी पश्चाताप करण्यापेक्षा जर आधीपासूनच तुम्ही तयारी सुरु ठेवली तर कुठे बिघडलं? यासाठी आज आम्ही तुम्हाला वर्षभर घडणाऱ्या चालू घडामोडींची परीक्षेसाठी तयारी करताना काय वाचावे आणि काय वाचू नये हे सांगणार आहोत.
न्यूज पेपर वाचताना खाली दिलेले महत्वाचे मुद्दे वाचा – (GK Updates)
- नवीन कायदे, बिल्स (उदा. महिलांसाठी आरक्षण)
- इ- गव्हर्नन्स (e -governance), प्रशासनिक फेरफार, सरकारच्या वेग वेगळ्या योजना
- डीम्ड युनिव्हर्सिटीशी (Deemed -University) संबंधित व इतर शिक्षणाशी संबंधित बातम्या
- आंतरराष्ट्रीय घडामोडी, वेगवेगळ्या देशांशी केलेले करार, भारताचे आजूबाजूच्या देशांशी असलेले वाद, सार्क[SAARC ], ओपेक[OPEC ], एशियन[ASEAN], चोग्म [CHOGM], सारख्या ओर्गानाय्झेशानांशी संबंधित बातम्या, आंतरराष्ट्रीय निवडणुका बद्दल बातम्या. (GK Updates)
- भारतीय सेनेच्या दुसऱ्या राष्ट्रांसोबत झालेल्या एक्झार्स्यीज[excercises], सैनिकी सामान खरेदी करार, सैनिकी ऑपरेशन्स, इत्यादी
- भारतीय आर्थिक बातम्या- जसं सरकारच्या पोलिसिज, मोठ्या कंपन्या व त्यांचे बॉस, भारतीय बजेट, चालू पंचवार्षिक योजनांचे आराखडे व त्यात घडून येणार बदल. रुपयाचे दुसऱ्या देशांच्या नाणेशी होत असलेले बदल, दुसऱ्या देशांशी आर्थिक संबंध व नवे करार.
- नवे रोग व त्यावर होणारे उपाय [vaccines], स्वाईन फ्लू, एड्स, इत्यादींवर नवीन उपचाराशी निगडीत बातम्या, सोलर एनर्जी, वातावरणाशी संबंधित होणारे बदल व त्यासाठी करण्यात येणार बदल.
- उपग्रह व नवनवीन मिशन्स, बायोटेक्नॉलॉजीशी संबधित बातम्या, हायब्रीड बीज उपक्रम, इत्यादी.
- राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अवार्ड्स कुणाला मिळालेत व कशासाठी (GK Updates)
- रविवारच्या पुरवणीमध्ये नवीन पुस्तके व त्यांच्या लेखकाबद्दल माहिती येत असते तर ती लिहून ठेवणे.
- टेनिस खेळाशी संबंधित बातम्या, क्रिकेट वर फार कमी प्रश्न असतात तर बाकी दुसऱ्या खेळा विषयीच्या बातम्या.
- भौगोलीक बदल, त्याची कारणे व त्यामुळे होणारे दुष्परिणाम. ह्यावर करण्यात आलेले व करण्यात येणारे उपाय, इत्यादी.
खाली दिलेले मुद्दे महत्वाचे नसल्यामुळे MPSC/UPSC मध्ये त्यावर प्रश्न येत नाहीत –
- राजकीय पक्ष व त्यांचे दलबदलू धोरण. राजनैतिक नेत्यांची भाषणे व एकमेकांवरच्या टीका
- टेररिस्ट ग्रुप्स, माओवादी ग्रुप्स, उल्फा व त्यांचे हल्ले, इतर आतंकवादी संघटन.
- अक्सीडेनट्स, नवीन ट्राफिक रुल्स, इत्यादी (GK Updates)
- चोरी व इतर गुन्हे, ह्याप्रकारच्या घटना
- क्रिकेट, बॉलीवूड बातम्या, फिल्मी गॉसिप इत्यादी
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com