करिअरनामा ऑनलाईन । मानवी आयुष्यात प्रत्येक रंगाला (GK Updates) स्वतःचं वेगळं अस्तित्व प्राप्त झालं आहे. असंच काहीसं आहे शाळेच्या बस विषयी. ज्या बस मुलांना घरातून शाळेत घेवून जातात आणि शाळेतून घरात आणून सोडतात या बस रस्त्यावरुन धावताना दररोज पाहतो. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, प्रत्येक स्कुलबसचा रंग पिवळा असतो. पण, तुम्ही कधी विचार केला की शाळेच्या बसचा रंग पिवळाच का असतो? आपण अनेकदा शाळेची बस बघितली आहे पण पिवळ्या रंगामागील कारण शोधण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की शाळेच्या बसला पिवळा रंग देण्यामागे नेमकं काय कारण आहे. चला तर पाहूया…
शाळेच्या बसला पिवळा रंग देण्याचं कारण काय?
1. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिला जातो पिवळा रंग –
पाऊस, धुके किंवा दवबिंदू असो पिवळा रंग दुरवरुनही दिसतो. पिवळया रंगाची परिघीय दृष्टी लाल रंगापेक्षा जास्त असते. शाळेच्या बसचा अपघात होण्याचा धोका टळावा, यासाठी शाळेच्या बसचा रंग पिवळा असतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार करुन शाळेच्या बसला पिवळा रंग दिला आहे.
2. लाल रंगाची वेवलेन्थ जास्त असते त्यामुळे लाल रंग दूरवरून लवकर दिसून येतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी लाल रंग वापरला जातो. वेवलेन्थचा विचार केला तर लाल रंगाच्या खाली पिवळा रंग येतो. त्याची वेवलेन्थ लाल रंगापेक्षा कमी असते पण इतर रंगापेक्षा जास्त असते.
3. सुप्रीम कोर्टाची गाईड लाईन – (GK Updates)
सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, शाळेची बस पिवळ्या रंगाची असावी याशिवाय या बसवर दोन्ही बाजूला आडवी हिरव्या रंगाची पट्टी असावी. बसच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला ‘School Bus’ लिहिणे गरजेचे आहे.
झेब्रा क्रॉसिंग किंवा रस्त्यावरील गावांची नावे किंवा सुचना सुद्धा पिवळ्या रंगामध्ये दिल्या जातात. रात्रीच्या अंधारात पिवळा रंग लवकर दिसून येतो.
चालकाला दुरवरुन स्टेशनचे नाव दिसावे, यासाठी रेल्वे स्टेशनचे नाव सुद्धा बोर्डवर पिवळ्या रंगांमध्ये लिहिले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com