करिअरनामा ऑनलाईन । एटीएमचा शोध लागला आणि बॅंकांमधून (GK Updates) पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभं रहाण्याच्या समस्येपासून सगळ्यांचीच सुटका झाली. आता पैसे काढण्यासाठी बॅंकेत मोठी रांग लावावी लागत नाही. जवळपासच्या कोणत्याही एटीएममध्ये जाऊन आपण पैसे अगदी सहजपणे काढू शकतो. मात्र, रोजच्या वापरात वापरलं जाणारं हे एटीएम (ATM) याशब्दाचा फुल फॉर्म नेमका काय आहे हे तुम्हाला माहित आहे का?माहिती घेण्यासाठी पुढे वाचा…
काय आहे ATM चा फुल फॉर्म?
अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये ATM चा फुल फॉर्म काय आहे? असा (GK Updates) प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न समोर आल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडतो. ‘Any time Money’ असाच ATM चा फुल फॉर्म अनेकांना माहित आहे. मात्र हे चुकीचे आहे. खरे पाहता ATM चा फुल फॉर्म ‘Automated Teller machine’ असा आहे.
A – Automated
T – Teller
M – Machine
कोणी लावला ATM चा शोध? (GK Updates)एटीएम मशीनचा शोध 1969 साली लागला. स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी हा शोध लावला. त्यांचा जन्म भारताच्या ईशान्य भागात असलेल्या शिलाँग शहरात झाला होता. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन यांनी लावलेल्या या शोधामुळे लोकांचा व्यवहार अधिक सोयीचा झाला आहे.
ATM काय असतं?
ATM म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मशीन आहे ज्याचा उपयोग हा पैसे काढणे, पैसे जमा करणे अशा अनेक प्रकारच्या पैशांच्या व्यवहारांमध्ये होतो. ATM च्या मशीन (GK Updates) शहराच्या विविध भागांत, ठिकठिकाणी दिसतात. ATM मशीन आल्यापासून बँकेचे व्यवहार करणे अधिक सोपे आणि जलद झाले आहेत.
जगात ATM ची विविध नावे
जगाच्या इतर भागांमध्ये ATM वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कॅनडामध्ये, एटीएमला ‘ABM’ स्वयंचलित बँकिंग मशीन (Automatic Banking Machine) असेही म्हणतात. इतर देशांमध्ये, कॅश पॉइंट, कॅश मशीन, मिनी बँक अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com