करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1 : जगातील असा कोणता प्राणी आहे, ज्याचे शरीर पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे ?
उत्तर : आर्माडिलो (Armadillo) हा असा प्राणी आहे, ज्याचे शरीर पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे. हा प्राणी दक्षिण अमेरिकेत आढळतो.
प्रश्न 2 : इंजेक्शन टोचण्यापूर्वी जी भीती निर्माण होते, त्याला काय म्हटलं जातं ?
उत्तर : इंजेक्शन टोचण्यापूर्वी जी भीती निर्माण होते त्याला ट्रायपॅनोफोबिया (Trypanophobia) म्हणतात.
प्रश्न 3 : डास किती उंचीपर्यंत उडू शकतो ?
उत्तर : डास सुमारे 50 फूट उंचीपर्यंत उडू शकतो.
प्रश्न 4 : असा कोणता जीव आहे, जो आपले पाय चालण्यासाठी नव्हे तर झोपण्यासाठी वापरतो ?
उत्तर : वटवाघुळ (Bats) हा असा प्राणी आहे, जो आपले पाय झोपण्यासाठी वापरतो.
प्रश्न 5 : कॅमेराला हिंदीत काय म्हणतात? (GK Updates)
उत्तर : कॅमेऱ्याला हिंदीत ‘प्रतिबिंब पेटी’ म्हणतात.
प्रश्न 6 : मानवी मेंदू कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही ?
उत्तर : मानवी मेंदू अन्न आणि धोक्याकडे इच्छा असूनही दुर्लक्ष करू शकत नाही.
प्रश्न 7 : जगातील सर्वाधिक कार कोणत्या शहरात आहेत.
उत्तर : जगातील सर्वाधिक कार ‘दिल्ली’ शहरात आहेत.
प्रश्न 8 : भारतावर सगळ्यात पाहिलं आक्रमण कोणी केलं ?
उत्तर : भारतावर आक्रमण करणारा पहिला (अरबी) मुस्लिम शासकः मुहम्मद बिन कासिम होता. (ई. स 712).
प्रश्न 9 : प्लाझ्मा हे नेमकं काय आहे, ते शरीरात कसं कार्य करतं? (GK Updates)
उत्तर : प्लाझ्मा हा रक्ताचा एक द्रव भाग आहे, ज्यामध्ये स्वतःचा महत्त्वपूर्ण घटक असतो. त्याचे बाह्यतः रक्तातील द्रव्यमान 50% पेक्षा जास्त असतं. प्लाझ्मा (Plasma) हा थोडासा पिवळसर रंग असलेला एक गढूळ द्रव आहे, हे द्रव एखाद्या व्यक्तीला देण्यासाठी ते कृत्रिमरित्या तयार केलं जातं. प्लाझ्मा प्रोटीन अनेक महत्वाची कार्ये करतात, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे पोषक रक्त पेशींमध्ये प्रोटीन कॅप्चर करणे आणि विशेष एन्झाईम्सच्या मदतीने त्यांचे विभाजन करणे, ज्यामुळे त्यांचे आत्म-संरक्षण सुलभ होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com