GK Updates : ‘हे’ आहेत जगातील सगळ्यात जास्त शिकलेले देश 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या देशाची, राज्याची प्रगती बघायची (GK Updates) असेल तर त्या देशाचं, राज्याचं साक्षरतेचं प्रमाण बघितलं जातं. आपल्याला भारतातील राज्यांच्या साक्षरतेचं प्रमाण तर माहिती आहेच. आज आपण जगातील देशांच्या साक्षरतेचं प्रमाण बघणार आहोत. हे देश खऱ्या अर्थाने शक्तिशाली देश आहेत कारण इथले नागरिक मोठ्या प्रमाणावर शिकलेले आहेत. जगात एकूण 197 देश आहेत. पण तुम्हाला माहित आहे का संपूर्ण जगात कोणता देश सर्वाधिक शिक्षित आहे? चला तर मग जाणून घेवूया…
ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) तर्फे दरवर्षी एक अहवाल प्रसिद्ध केला जातो, ज्यामध्ये विविध निकषांनुसार (GK Updates) कोणता देश सर्वाधिक शिक्षित आहे हे सांगितले जाते. OECD ने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या रँकिंगनुसार जगातील टॉप 10 सुशिक्षित देशांची यादी पाहूया

1. कॅनडा : ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार कॅनडा हा जगातील सर्वाधिक शिक्षित देश आहे. 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या अहवालात कॅनडाला 60 टक्के गुण देण्यात आले होते.
2. रशिया : रशियाने दुसरा क्रमांक (GK Updates) पटकावला आहे. OECD च्या अहवालात रशियाला 56.7 टक्के गुण मिळाले आहेत.
3. जपान: या यादीत जपानला तिसरे स्थान मिळाले आहे. OECD च्या अहवालात जपानचा स्कोअर 52.7 टक्के आहे.

4. लक्झेंबर्ग :
या यादीत चौथ्या क्रमांकावर कोणत्या देशाने आपले स्थान निर्माण केले आहे, याबद्दल बोलायचे झाले तर लक्झेंबर्गने या यादीत चौथ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्याला 51.3 टक्के गुण देण्यात आले आहेत.
5. दक्षिण कोरिया : OECD च्या 2022 च्या अहवालात दक्षिण कोरिया पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण कोरियाने 50.7 टक्के गुण मिळवले आहेत.
6. इस्रायल आणि अमेरिका : (GK Updates) हे दोन देश या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. OECD च्या अहवालात इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांनी सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. दोन्ही देशांना 50.1 टक्के गुण मिळाले.
7. आयर्लंड : हा जगातील सातवा सर्वाधिक शिक्षित देश आहे. OECD च्या अहवालात आयर्लंडला 49.9 टक्के गुण देण्यात आले आहेत.

8. युनायटेड किंग्डम : या देशाने या यादीत आठव्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्याला 49.4 टक्के गुण मिळाले आहेत.
9. ऑस्ट्रेलिया : 9 व्या स्थानावर असलेल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने 49.3 टक्के गुणांसह या यादीत 9 वे स्थान मिळवले आहे. (GK Updates)
10 फिनलँड : या यादीत दहाव्या क्रमांकावर असलेला देश म्हणजे फिनलँड. फिनलँडने 47.9 टक्के गुणांसह या यादीत दहावे स्थान पटकावले आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com