करिअरनामा ऑनलाईन । लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत (GK Updates) असा कोणी नसेल ज्याने ‘पोलीस’ हा शब्द ऐकला नसेल. पोलीस हा सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली आहे. प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत. पोलिसांमुळे आज आपण सुरक्षित आहोत. पोलिसांचे नाव आणि काम आपल्या सर्वांना माहित आहे, पण तुम्हाला माहित आहे का की ‘पोलिस’ या शब्दाचा देखील एक पूर्ण फॉर्म आहे…? ऐकून विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे. पोलिस हा शब्द अनेक शब्दांनी तयार झाला आहे. जाणून घेवूया…
देशातील प्रत्येक प्रदेशातील गुन्ह्यांचा मुकाबला करताना पोलिसांचे काम किती महत्त्वाचे असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पोलिस विविध मार्गांनी नागरिकांचे गुन्हेगारांपासून संरक्षण (GK Updates) करतात. पोलीस हे एक सुरक्षा दल आहे जे आपल्या देशातील रहिवाशांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते, जसे सैन्य परकीय शत्रूंपासून आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज असते. त्याचप्रमाणे, अंतर्गत अनैतिक कृत्यांपासून सामान्य जनतेचे संरक्षण करणे आणि देशाच्या हितासाठी प्रत्येक गुन्हेगारी खटला चालवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्हेगारी प्रकरणामुळे त्रास होत असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर तो पोलिसांची मदत घेऊन त्याच्या स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवू शकतो.
काय आहे ‘POLICE’ शब्दाचा फुलफॉर्म? (GK Updates)
भारतातील पोलीस खाते ब्रिटिशांनी सुरू केले होते. अनेक लोकांना पोलिसचा (Police) फुल फॉर्म माहित नाही, पोलिस म्हणजे ‘Public Officer for Legal Investigations and Criminal Emergencies’ असे पोलिस या शब्दाचे पूर्ण रुप आहे. भारतात कोलकाता (पश्चिम बंगाल) वगळला तर भारतातील सर्व राज्यांतील पोलीस खाकी वर्दी परिधान करतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com