करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1- महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे?
उत्तर- कळसुबाई (ऊंची 1646 मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
प्रश्न 2- एकही ट्रॅफिक सिग्नल नसलेल्या देशाचं नाव सांगा?
उत्तर- भूतान हा असा देश (GK Updates) आहे जिथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही.
प्रश्न 3- असा कोणता देश आहे, ज्यातून एकही नदी वाहत नाही?
उत्तर- सौदी अरेबिया हा असा देश आहे, जिथे एकही नदी वाहत नाही. याशिवाय येथे पाऊस खूप कमी पडतो.
प्रश्न 4- कोणत्या देशात एकही विमानतळ नाही?
उत्तर- व्हॅटिकन सिटीमध्ये एकही विमानतळ नाही.
प्रश्न 5- (GK Updates) भारतात किती सण आहेत?
उत्तर- भारतात 36 प्रमुख सण आहेत.
प्रश्न 6. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते?
उत्तर- रत्नागिरी
प्रश्न 7. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो?
उत्तर- आंबोली, सिंधुदुर्ग.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com