GK Updates : असं कोणतं फळ आहे ज्याचे बी फळाच्या आत नव्हे तर बाहेर असते? कोड्यात टाकणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – जगातील पहिला मानव (GK Updates) कोणत्या देशात जन्माला आला?
उत्तर – जगातील पहिला मानव आफ्रिकेत जन्माला आला.
प्रश्न 2 – जगातील सर्वात जुने शहर कोणते?
उत्तर- दमास्कस हे जगातील 11,000 वर्षे जुने शहर आहे.

प्रश्न 3– तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?
उत्तर – तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे.
प्रश्न 4 – कोणते फळ आहे ज्याचे बी फळाच्या बाहेर आहे?
उत्तर – स्ट्रॉबेरी हे असे फळ आहे (GK Updates) ज्याचे बी फळाच्या बाहेर असते.
प्रश्न 5 – जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक कोणत्या देशात आहेत?
उत्तर – महिला वैमानिकांच्या संख्येत भारत जगात आघाडीवर आहे. म्हणजेच पायलट म्हणून करिअर निवडण्यात आज भारतातील महिला इतर देशापेक्षा पुढे आहेत.

प्रश्न 6 – (GK Updates) नारळाचे पाणी कोणता रोग कमी करते?
उत्तर – नारळाचे पाणी रक्तदाब कमी करते.
प्रश्न 7 – भारतातील सर्वात जुने शहर कोणते?
उत्तर – शहरे आणि गावांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी हे आशियातील सर्वात जुने शहर मानले जाते. त्यातील लोकांच्या वास्तव्याचे पुरावे 3000 वर्षांहून अधिक जुने आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com