GK Updates : कोणत्या देशात सूर्य हिरवा दिसतो? मायक्रोसॉफ्टची स्थापना कधी झाली? General Knowledge वाढवणारे प्रश्न पहाच

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. कोणत्या देशात सूर्य हिरवा दिसतो?
उत्तर- हिरव्या रंगाचा सूर्य दिसणे ही एक दुर्मिळ ऑप्टिकल घटना आहे. जी कोणत्याही देशात पाहायला मिळते. पण अमेरिकेतील हवाईमध्ये हे दृश्य सर्वाधिक दिसते. (GK Updates)
प्रश्न २. कोकिळ कोणत्या राज्यातील राज्य पक्षी आहे?
उत्तर- कोकिळ हा झारखंडचा राज्य पक्षी आहे.
प्रश्न-3. पृथ्वीराज चौहान यांचे चरित्र ‘पृथ्वीराज रासो’ कोणी लिहिले आहे?
उत्तर- पृथ्वीराज चौहान यांचे चरित्र ‘पृथ्वीराज रासो’ चांदबरदाई यांनी लिहिले आहे.

प्रश्न 4. मायक्रोसॉफ्टची स्थापना कधी झाली?
उत्तर- मायक्रोसॉफ्टची स्थापना 1975 साली झाली.
प्रश्न-5. अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी दिला जातो?
उत्तर- क्रीडा क्षेत्रासाठी (GK Updates)
प्रश्न- 6. कोणता रंग शांततेचे प्रतीक आहे?
उत्तर- पांढरा

प्रश्न-7. इंग्रजी अक्षरात किती स्वर आहेत आणि त्यांची नावे सांगा?
उत्तर- इंग्रजी वर्णमालेत पाच स्वर आहेत – A, E, I, O, U.
प्रश्न-8. भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
उत्तर – भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com