GK Updates : स्पर्धा परीक्षेत विचारले जातात ‘असे’ प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढणारा ब्रिटिश अधिकारी कोण होता?
उत्तर – तो ब्रिटिश अधिकारी विल्यम गॉर्डन होता, जो भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांविरुद्ध लढला होता.
प्रश्न 2 – कोणत्या देशाच्या सीमा जगातील (GK Updates) बहुतेक देशांसोबत जोडल्या आहेत?
उत्तर – वास्तविक पाहता चीन हा देश आहे जो जगातील बहुतेक देशांशी आपली सीमा सामायिक करतो.

प्रश्न 3 – हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ते सांगू शकाल का?
उत्तर – हैदराबाद शहर मुसी नदीच्या काठी वसलेले आहे.
प्रश्न 4 – असा कोणता प्राणी आहे ज्याला आपल्या मृत्यूची अगोदरच माहिती असते?
उत्तर – विंचू हा एकमेव प्राणी आहे ज्याला त्याच्या मृत्यूबद्दल आधीच माहिती असते.

प्रश्न 5 – भारतात रॉकेटची निर्मिती सर्वप्रथम कोणी केली हे सांगता येईल का?
उत्तर – भारतात पहिले रॉकेट हैदल अलीने बनवले होते.
प्रश्न 6 (GK Updates) – हिंदी दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – हिंदी दिन 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com