करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1 – दुधामुळे शरीरासाठी कोणते नुकसान पोहचू शकते. (GK Update)
उत्तर – दूध हे कॅल्शियमचे समृद्ध स्रोत मानले जाते. ते जास्त प्रमाणात प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
प्रश्न 2 – भारतातील कोणत्या राज्यात पेरूचे सर्वाधिक (GK Update) उत्पादन घेतले जाते?
उत्तर – पेरूचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होते.
प्रश्न 3 – जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणते आहे?
उत्तर – लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशन, इंग्लंड – हे स्टेशन 15 सप्टेंबर 1830 रोजी स्थापन करण्यात आले. हे स्टेशन जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन मानले जाते.
प्रश्न 4 – भारतातील नद्यांपैकी पुरुष नदी कोणती? (GK Update)
उत्तर – ब्रह्मपुत्रा ही भारतातील नद्यांपैकी एक पुरुष नदी आहे.
प्रश्न 5 – जगातील पहिला मोबाईल कोणत्या कंपनीने बनवला?
उत्तर – जगातील पहिला मोबाईल मोटोरोला कंपनीने बनवला.
प्रश्न 6 – कोणत्या आजारात दूध पिऊ नये?
उत्तर – कावीळ, जुलाब आणि आमांश यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी दूध पिणे टाळावे.
प्रश्न 7 – कोणत्या प्राण्याचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे आहेत?
उत्तर – शहामृगाचे डोळे (GK Update) त्याच्या मेंदूपेक्षा मोठे आहेत.
प्रश्न 8 – भारतातील कोणत्या रेल्वे स्टेशनवर जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे?
उत्तर – जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कर्नाटकातील श्री सिद्धरुदा स्वामीजी स्टेशनवर आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com