करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न – आपल्या देशातील सर्वात जुना जिल्हा कोणता आहे? (GK Updates)
उत्तर – पूर्णिया हा भारतातील सर्वात जुन्या जिल्ह्यांपैकी एक आहे आणि तो 1770 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने अस्तित्वात आणला.
प्रश्न : 10 रुपयांचे नाणे बनवण्यासाठी किती खर्च येतो?
उत्तर – 10 रुपयांचे नाणे बनवण्यासाठी 3 रुपये खर्च येतो.
प्रश्न – भारतातील कोणते राज्य कधीही इंग्रजांचे गुलाम झाले नाही?
उत्तर – गोवा हे एकमेव राज्य आहे जे (GK Updates) कधीही इंग्रजांचे गुलाम झाले नव्हते.
प्रश्न – इस्रायलच्या जवळपास बरोबरीच्या भारतातील राज्याचे नाव सांगा?
उत्तर – भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक मिझोराम हे इस्रायलच्या बरोबरीचे आहे. इस्रायलचे क्षेत्रफळ केवळ २१,९३७ चौरस किलोमीटर आहे आणि मिझोरामचे क्षेत्रफळ २१,०८१ चौरस किलोमीटर आहे.
प्रश्न – भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे?
उत्तर – भारतातील श्रीमंत राज्यांच्या (GK Updates) यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
प्रश्न – फुलपाखरांमध्ये इतके रंगाचे नमुने कुठून येतात?
उत्तर – फुलपाखरू आपल्या पंखांच्या रंगीबेरंगी पॅटर्नमुळे सर्वांना आकर्षित करते. फुलपाखरांच्या पंखांमध्ये असे आकर्षक नमुने तयार होण्याचे मुख्य कारण म्हणजे रंगद्रव्य, जे सामान्य रंगासाठी जबाबदार असते. या फुलपाखरांचा रंग बदलत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com