करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1 – सीमांत गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? (GK Update)
उत्तर – (GK Update) खान अब्दुल गफार खान यांना सीमांत गांधी म्हणून ओळखले जाते.
प्रश्न 2 – टॅप रूट वनस्पतींचे कशापासून संरक्षण करते?
उत्तर – टॅप रूट वनस्पतींचे कीटकांपासून संरक्षण करतात.
प्रश्न 3 – आशियातील लास वेगास कोणत्या शहराला म्हणतात?
उत्तर – मकाऊला आशियातील लास वेगास म्हणतात.
प्रश्न 4 – रक्तगट कोणी (GK Update) शोधला ते सांगता येईल का?
उत्तर – कार्ल लँडस्टीनरने रक्तगट शोधला.
प्रश्न 5 – कोणत्या ग्रहाला ‘इव्हनिंग स्टार’ म्हणतात?
उत्तर – शुक्राला ‘इव्हनिंग स्टार’ म्हणतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com