GK Updates : तुरूंगातून पळून जाण्यासाठी कोणत्या देशात शिक्षा दिली जात नाही? वाचा असे भन्नाट प्रश्न

GK Updates 13 Apr.
xr:d:DAF2TZni6GE:1576,j:6359507491013151070,t:24041406
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न – अशी कोणती वस्तू आहे ज्याला मान आहे पण डोके नाही?
उत्तर – बाटली
प्रश्न – कोणत्या शहराला 1 दिवसासाठी भारताची राजधानी करण्यात आलं होतं
उत्तर – प्रयागराज (अलाहाबाद) 1858 मध्ये 1 दिवसासाठी भारताची राजधानी घोषित करण्यात आले होते.

प्रश्न – पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदानासाठी कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो?
उत्तर – पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट (GK Updates) योगदान देणार्‍या पत्रकाराला ‘पुलित्झर पुरस्कार’ देण्यात येतो.
प्रश्न – तुरूंगातून पळून जाण्यासाठी कोणत्या देशात शिक्षा नाही?
उत्तर – जर्मनीत तुरूंगातून पळून जाणाऱ्या कैद्याला शिक्षा होत नाही.

प्रश्न – ज्या प्राण्याचे हृदय 1 मिनिटात 1000 वेळा धडकते त्या प्राण्याचे नाव आपल्याला माहित आहे काय?
उत्तर – पाल ही एक प्राणी आहे ज्याचे हृदय 1 मिनिटात 1000 वेळा धडकते.
प्रश्न – एखाद्या व्यक्तीला पॅराशूटशिवाय विमानातून फेकले गेले तरी तो कसा जगतो?
उत्तर – कारण त्यावेळी ती व्यक्ती विमान धावपट्टीवरच होती त्यामुळे ती व्यक्ती जगते.
प्रश्न – (GK Updates) तुम्ही 100 मधून किती वेळा 10 वजा करू शकता?
उत्तर – एक वेळा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com