GK Updates : UPSC तसेच MPSC परीक्षेत विचारले जातात ‘असे’ प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न – भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला?
उत्तर – भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कावेरी नदीवर बांधलेला शिवसमुद्रम फॉल्स येथे स्थापित करण्यात आला.
प्रश्न – श्रीनगर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?
उत्तर – (GK Updates) श्रीनगर झेलम नदीच्या काठावर वसलेले आहे.

प्रश्न – ‘कॉम्प्युटरचे जनक’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर – चार्ल्स बॅबेज यांना ‘कॉम्प्युटरचे जनक’ म्हणून ओळखले जातात.
प्रश्न – तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी LKG-UKG मध्ये शिक्षण (GK Updates) घेतले असेल, पण तुम्हाला त्यांचे पूर्ण स्वरूप माहित आहे का?
उत्तर – LKG चे पूर्ण रूप लोअर किंडरगार्टन आहे आणि UKG चे पूर्ण रूप अपर किंडरगार्टन असे आहे.

प्रश्न – बक्सा व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? (GK Updates)
उत्तर – बक्सा व्याघ्र प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये आहे आणि त्याची स्थापना 1982 मध्ये झाली.
प्रश्न – नॅशनल बोटॅनिकल गार्डन कोणत्या शहरात आहे?
उत्तर – नॅशनल बोटॅनिकल गार्डन कोलकाता येथे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com