GK Updates : मायक्रोसॉफ्टची स्थापना केव्हा झाली? Botany हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला? सरकारी परिक्षेत विचारले जाणारे प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – (GK Updates) 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
उत्तर –
1919 मध्ये दिल्लीत अखिल भारतीय खिलाफत परिषद आयोजित करण्यात आली होती.प्रश्न 2 – भारतातील कोणत्या प्रश्न 2 – शहरात सर्वाधिक चामड्याचे उत्पादन होते हे तुम्हाला माहिती आहे का?
उत्तर –
भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा शहरात सर्वात जास्त चामड्याचे उत्पादन केले जाते.

प्रश्न 3 – Botany हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला आहे?
उत्तर –
Botany हा शब्द लॅटिन भाषेतून घेतला गेला आहे, ज्याला लॅटिनमध्ये Botane म्हणतात.
प्रश्न 4 – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण होता?
उत्तर – सुनील गावस्कर हा पहिला (GK Updates) फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा केल्या आहेत.

प्रश्न 5 – ‘यादविंद्र कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर –
यादवींद्र चषक हॉकीशी संबंधित आहे.
प्रश्न 6 – मायक्रोसॉफ्टची स्थापना केव्हा झाली?
उत्तर –
मायक्रोसॉफ्टची (GK Updates) स्थापना 1975 साली झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com