GK Updates : ‘प्लास्टिक मनी’ कशाला म्हणतात? भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? स्पर्धा परिक्षेत विचारले जाणारे 7 प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. खालीलपैकी कोणता पैसा ‘प्लास्टिक मनी’ (Plastic Money) म्हणून ओळखला जातो?
1) ट्रम्प कार्ड
2) क्रेडिट कार्ड
3) पॅन कार्ड
4) चलनी नोट
उत्तर: 2) क्रेडिट कार्ड
2. व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे?
1) स्पिरीज ऑफ लॉज
2) कॅन्डीड
3) एमील
4) यापैकी एकही नाही
उत्तर:2) कॅन्डीड (GK Updates)

3. विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो?
1) कमी असतो
2) अतिउच्च असतो
3) मध्यम असतो
4) यापैकी एकही नाही
उत्तर:2) अतिउच्च असतो
4. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही कोणाची शिकवण आहे?
1) वर्धमान महावीर
2) भगवान बुध्द (GK Updates)
३)लोकमान्य टिळक
4) यापैकी एकही नाही
उत्तर:2) भगवान बुध्द

5. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे?
1) गुजरात
2) अंदमान निकोबार
3) महाराष्ट्र
4) अरुणाचल प्रदेश
उत्तर:2) अंदमान निकोबार
6.  बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली?
1) गो. ग. आगरकर
2) गो. कृ. गोखले
3) नाना जगन्नाथ शंकरशेठ
4) वि. दा. सावरकर
उत्तर:3) नाना जगन्नाथ शंकरशेठ
7. स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
1) भारत
2) न्यूझीलंड (GK Updates)
3) अमेरिका
4) इंग्लंड
उत्तर: 2) न्यूझीलंड
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com