GK Updates : भारतात सर्वात जास्त खाल्ले जाणारे धान्य कोणते? कोणता प्राणी एकाचवेळी दोन दिशेला बघतो? सामान्य ज्ञानात भर घालणारे प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्‍न 1 – भारतात सर्वात जास्त खाल्ले जाणारे धान्य कोणते?
उत्तर- भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे धान्य तांदूळ आहे.
प्रश्न 2 – भारतातील कोणत्या नदीला एक नव्हे, तर दोन राज्यांची लाईफलाईन म्हणतात?
उत्तर- तिस्ता नदी ही सिक्कीमची सर्वात मोठी नदी आहे. ही नदी सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधून वाहते.
प्रश्न 3 – कोणत्या नदीला लंडनची गंगा नदी म्हणतात?
उत्तर- थेम्स नदीला लंडनची गंगा म्हणतात.

प्रश्न 4 – लाल किल्ला बांधायला किती वेळ लागला?
उत्तर- लाल किल्ला बांधायला दहा वर्षं लागली.
प्रश्न 5 – तीन भाषांपासून बनलेले शहर कोणते?
उत्तर- अहमदाबाद हा मूळ शब्द संस्कृतमधून आला आहे. तर ‘दा’ हा शब्द इंग्रजीतून आणि ‘बाद’ हा हिंदीतून आला आहे.
प्रश्‍न 6 – पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
उत्तर- मज्जासंस्था.
प्रश्‍न 7 – असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
उत्तर- सरडा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com