करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
1)तापी नदीचा उगम कोठे झाला?
1) मुलताई
2) तपोवन
3) बागेश्वर
4) जानापाव
उत्तर: 1) मुलताई (GK Updates)
2) औरंगाबाद शहर…………दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
1) बुलंद
2) बावन्न
3) सात
4) अकरा
उत्तर:2) बावन्न
3) 95 वे अभा. मराठी साहित्य संमेलन 2022 चे ठिकाण कोणते?
1) नाशिक
2) परभणी
3) मुंबई
4) उदगीर
उत्तर:4) उदगीर
4)अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती?
1) आरडीएक्स
2) जिलेटिन
3) पीईटिएन (GK Updates)
4) टिएनटी
उत्तर:2) जिलेटिन
5) राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?
1) द्रोणाचार्य खेलरत्न अवॉर्ड
2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड
3) राष्ट्रीय खेल पुरस्कार
4) यापैकी नाही
उत्तर: 2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड
6)महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
1) पुणे
2) नाशिक
3) मुंबई
4) नागपूर
उत्तर:4) नागपूर
7)महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?
1) हरिद्वार
2) पंढरपूर
3) नाशिक
4) घृष्णेश्वर
उत्तर: 3) नाशिक
8) सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
1) न्यायमूर्ती रानडे
2) स्वातंत्र्यवीर सावरकर
3) अॅलन ह्युम
4) ग.वा. जोशी.
उत्तर:1) न्यायमूर्ती रानडे
9) घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे?
1) केशवराव जेधे
2) भास्करराव जाधव
3) गोपाळ हरि देशमुख
4) यापैकी नाही
उत्तर:2) भास्करराव जाधव
10) सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) जळगाव
2) ठाणे (GK Updates)
3) यवतमाळ
4) अमरावती
उत्तर: 4) अमरावती
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com