करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
1. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
(A) चमेली
(B) गुलाब
(C) कमळ
(D) झेंडू
उत्तर- कमळ
2. भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?
(A) वडाचे झाड
(B) चंदनाचे
(C) कडुनिंबचे झाड
(D) अशोकाचे झाड
उत्तर- वडाचे झाड (GK Updates)
3. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
(A) वंदे मातरम्
(B) जन गण मन
(C) सारे जहाँ से अच्छा
(D) (A) आणि (बी)
उत्तर -जन गण मन (रचनाकार – रवींद्रनाथ टागोर)
4. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे?
(A) भरत चक्रवर्ती
(B) चंद्रगुप्त मौर्या
(C) महाराणा प्रताप
(D) अशोक मौर्या
उत्तर – भरत चक्रवर्ती
5. भारतात सर्वात उंच मीनार कोणते आहे?
(A) चार मीनार
(B) झूलता मीनार
(C) कुतुब मीनार
(D) शहीद मीनार
उत्तर – कुतुब मीनार – ऊंची 73 मीटर
6. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?
(A) भाकरा धरण
(B) हिराकुड धरण (GK Updates)
(C) इंदिरा सागर धरण
(D) नागार्जुन सागर धरण
उत्तर – हिराकुड धरण
7. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे?
(A) जवाहर बोगदा
(B) रोहतांग बोगदा
(C) अटल रोड बोगदा
(D) कामशेत बोगदा
उत्तर – अटल रोड बोगदा
8. भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे?
(A) हरमंदिर साहिब
(B) स्टॅच्यू ऑफ युनिटी
(C) नालंदा
(D) हंपी
उत्तर – स्टॅच्यू ऑफ युनिटी
9. (GK Updates) भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?
(A) श्री पद्मावती महिला विद्यापीठ
(B) एलएसआर महिला विद्यापीठ
(C) वनस्थळी विद्यापीठ
(D) एसएनडीटी महिला विद्यापीठ
उत्तर – एसएनडीटी महिला विद्यापीठ स्थापना – दि. 2 जुलै 1916
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com