GK Updates : काय आहे ‘TRAIN’ चा फुल फॉर्म? तुमच्या रेल्वे तिकिटावरील शॉर्ट फॉर्मचे खरे अर्थ जाणून घ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतासह जगभरात अनेकजण ट्रेनने (GK Updates) प्रवास करतात. भारतीय तर ट्रेनने प्रवास करण्यासाठी  अक्षरशः वेडे झालेले दिसतात. लोकल ट्रेनमधील गर्दी तर तुम्हाला माहितीच आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी तर कित्येक महिने आधी बुकिंग करावे लागते. पण तुम्हाला ट्रेन म्हणजे काय हे आज आम्ही सांगणार आहोत. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण मंडळी ट्रेन (TRAIN) हा एक दोन अक्षरी शब्द नसून चक्क चार शब्दांना जोडणारा एक शॉर्ट फॉर्म आहे. आज या शॉर्ट फॉर्मचा उलगडा आपण करूच पण त्यासह ट्रेन्सशी संबंधित अन्यही शब्दांचे अर्थ जाणून घेऊया…

काय आहे Train चा फुल फॉर्म? (GK Updates)
ट्रेन हा काही शब्द जोडून बनवलेला एक शब्द आहे जो आता आपल्या नेहमीच्या बोलण्यात चांगलाच रुळला आहे. पण ट्रेनसाठी मूळ शब्द होता ‘रेल्वे’. या TRAIN चा फुलफॉर्म म्हणजे Tourist Railway Association Inc. असा आहे. याला शॉर्ट फॉर्म मध्ये ट्रेन (TRAIN) म्हणतात. ट्रेन हा शब्द इंग्रजीतून घेतलेला नाही, तर तो फ्रेंच शब्द Trahiner पासून आला आहे. याचा अर्थ खेचणे किंवा लॅटिनमध्ये त्याला Trahere असे म्हणतात. ट्रेन संदर्भात आपण अन्यही काही शब्द अनेकदा ऐकले असतील, त्याचे फुल फॉर्म जाणून घेवूया…

1. IRCTC : इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन.
2. IRCON : इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन लिमिटेड
3. RVNL : रेल्वे विकास निगम लिमिटेड
4. RDSO : रिसर्च डिजाइन स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन
आता आपण ट्रेनचा व त्या संबंधित विभागांचा अर्थ पाहिला पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या तिकिटावर सुद्धा असे काही सांकेतिक शब्द असतात. याचाही अर्थ पाहूया..

WL : वेटिंग लिस्ट (म्हणजेच तुमचे तिकीट बुकिंग अजूनही वेटिंगमध्ये आहे)
RSWL : रोड साईड वेटिंग लिस्ट यामध्ये (GK Updates) तिकीट निश्चित होण्याची शक्यता कमी असते.
RQW : जर तिकीट ट्रेन प्रवासाच्या मध्यवर्ती स्टेशनपासून इतर मध्यवर्ती स्टेशनपर्यंत बुक केलं असेल व अन्य कोट्यातून तिकीट कन्फर्म झाले नसेल तर तुमचे तिकीट हे रिक्वेस्ट वेटिंग लिस्ट मध्ये जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com