GK Updates : फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? सामान्य ज्ञान वाढवणारे भन्नाट प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर – नाईल नदी
प्रश्न 2. सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला?
उत्तर – बौद्ध धर्म (GK Updates)
प्रश्न 3. धामी गोळीबाराची घटना कधी घडली?
उत्तर – १६ जुलै १९३९

प्रश्न 4. (GK Updates) भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली?
उत्तर – 26 जानेवारी 1950
प्रश्न 5. भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोण?
उत्तर – सर्वोच्च न्यायालय.
प्रश्न 6. राष्ट्रीय महिला आयोग कायदा संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला?
उत्तर – 1990 मध्ये

प्रश्न 7. फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरला जातो?
उत्तर- हायड्रोजन
प्रश्न 8. भारतात हिऱ्याच्या खाणी कुठे आहेत?
उत्तर – आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड(GK Updates)

प्रश्न 9. मोटार वाहनांमधून उत्सर्जित होणारा वायू कोणता?
उत्तर- कार्बन मोनोऑक्साइड.
प्रश्न 10. सोन्याची शुद्धता कशी मोजतात?
उत्तर- कॅरेट (GK Updates)
प्रश्न 11. भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प कोणता?
उत्तर- दामोदर खोरे प्रकल्प.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com