GK Updates : मुलाखतीत विचारले जातात ‘असे’ 8 प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : तमिळनाडू
2. एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
उत्तर : लिओने मेस्सी (GK Updates)
3. भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?
उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट
4. नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तरप्रदेश

5. भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?
उत्तर : फायझर
6. आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?
उत्तर : अली खान
7. ‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
8. प्रत्येक घरात एलपीजी गॅस (GK Updates) जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com