करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
1. (GK Updates) असा कोणता देश आहे जिथं मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी मिळते?
उत्तर- आइसलँड
2. कोणत्या प्राण्याचं रक्त निळं असतं?
उत्तर- गोगलगाय, कोळी आणि ऑक्टोपस
3. कोणत्या देशात सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे फ्री आहे?
उत्तर- लक्झमबर्ग (GK Updates)
4. कोणत्या देशात एकही नदी नाही?
उत्तर- सौदी अरेबिया
5. पृथ्वीवरील कोणत्या देशात एकही रेल्वे ट्रॅक नाही?
उत्तर- भूतान, सायप्रस, आइसलँड इत्यादी असे देश आहेत की जिथं एकही रेल्वे ट्रॅक नाही.
6. ताजमहालची निर्मिती मुमताजच्या मृत्यूच्या आधी झाली की नंतर?
उत्तर- मुमताज यांचं निधन (GK Updates) बुरहानपूर येथे १७ जून १६३१ रोजी झालं होतं. त्यानंतर ताजमहालची निर्मिती झाली ज्याचं काम १६३४ साली पूर्ण झालं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com