GK Updates : येणाऱ्या कोणत्या वर्षी पहिला भारतीय चंद्रावर पोहचण्याचे उद्दिष्टय आहे? पहा जनरल नॉलेज वाढवणारे प्रश्न

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. इस्रो चे कोणत्या सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभरण्याचे लक्ष्य आहे?
(A) २०२८
(B) २०३०
(C) २०३५
(D) २०४०
उत्तर -(C) २०३५
2. कोणत्या वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रो ला उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलें आहे?
(A) २०३५
(B) २०४०
(C) २०४५
(D) २०५०
उत्तर -(B) २०४०

3. कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे?
(A) पाकिस्तान
(B) मलेशिया
(C) श्रीलंका
(D) भारत
उत्तर -(D) भारत (GK Updates)
4. भारतात प्रथमच कोठे व्होलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा होत आहे?
(A) गोवा
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
उत्तर -(A) गोवा

5. तिसरी जागतिक सागरी परिषद २०२३ कोठे होत आहे?
(A) चेन्नई
(B) केरळ
(C) मुंबई
(D) विशाखापट्टनम
उत्तर -(C) मुंबई
6. मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) सर्वांनंद सोनोवाल
(B) रमेश बैस
(C) प्रमोद सावंत
(D) नरेंद्र मोदी (GK Updates)
उत्तर -(D) नरेंद्र मोदी
7. महाराष्ट्र राज्यात किती ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत?
(A) ४००
(B) ४५०
(C) ५००
(D) ५५०
उत्तर -(C) ५००
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com