करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
आज आपण खगोल शास्त्राशी संबंधित काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत….
1 .ऑक्टोबर २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने (IAU) कोणत्या ग्रहाचे ग्रहपद काढून त्याचा समावेश छोट्या ग्रहांच्या समूहात केला ?
उत्तर – प्लुटो
2. सर्वप्रथम आकाशगंगेबाबत भाकित करणारा खगोलशास्त्रज्ञ कोण ?
उत्तर – हर्षल (GK Updates)
3. सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला किती मिनिटे लागतात?
उत्तर – ८ मिनिटे १६ सेकंद
4. चंद्रावरून प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो ?
उत्तर – १.३ सेकंद
5. सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – बुध
6. पृथ्वीपासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – (GK Updates) शुक्र
7. ग्रहांमध्ये सर्वाधिक घनता पृथ्वीची आहे, तर सर्वांत कमी घनत्व असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – शनी
8. कोणत्या ग्रहाची परिवलन व परिभ्रमण या दोन्ही गती जवळपास सारख्याच आहेत ?
उत्तर – शुक्र
9. सर्वांत कमी परिवलन गती कोणत्या ग्रहाची आहे?
उत्तर – शुक्र
10. सूर्यकुळातील सर्वांत मोठा ग्रह गुरू आहे, तर सर्वांत लहान ग्रह कोणता आहे?
उत्तर – बुध
11. कोणत्या दोन ग्रहांचा आकार जवळपास सारखाच असल्यामुळे त्यांना जुळे ग्रह असे संबोधतात.?
उत्तर – पृथ्वी व शुक्र
12. सूर्यकुळातील तारा असे कोणत्या ग्रहाला संबोधतात.?
उत्तर – शुक्र (GK Updates)
13. मंगळ या ग्रहाला ….असेही संबोधतात.?
उत्तर – लाल ग्रह
14. सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला तारा कोणता ?
उत्तर – प्रॉक्झिमा सेंटॉरी
15. सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा किती पटींनी मोठा आहे ?
उत्तर – १०९ पटींनी
16. सूर्याच्या आकारामध्ये किती पृथ्वी बसू शकतात ?
उत्तर – जवळपास तेरा लक्ष
17. सूर्यापासून मिळणारा प्रकाश कशामुळे मिळतो?
उत्तर – हायड्रोजनच्या एकत्रीकरणाने (GK Updates)
18. पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते?
उत्तर – पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे
19. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो ?
उत्तर – ५९ ट्टक्के
20. सूर्यकुळात सर्वाधिक गुरुत्वाकर्षण शक्ती असलेला ग्रह कोणता ?
उत्तर – गुरू
21. कोणत्या ग्रहावर ‘शुमेकर लेव्ही’ हा धुमकेतू आदळला होता ?
उत्तर – गुरू
22. सूर्याला स्वतःभोवती फिरण्याला (परिवलनाला) किती कालावधी लागतो ?
उत्तर – २५ दिवस
23. चंद्र दररोज noकिती मिनिटे उशिरा उगवतो ?
उत्तर – ५० मिनिटे
24. सूर्यसिद्धांत कुणी मांडला ?
उत्तर – पेरी लाप्लासे (GK Updates)
25. सूर्यमालेतील निळ्या रंगाचा ग्रह कोणता ?
उत्तर – पृथ्वी
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com