करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1 – ‘संतोष ट्रॉफी’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर – संतोष ट्रॉफी फुटबॉलशी संबंधित आहे.
प्रश्न 2 – (GK Updates) अमीर खुसरो कोणत्या सम्राटाच्या दरबारातील कवी होता?
उत्तर – अमीर खुसरो हा अलाउद्दीन खिलजीच्या दरबारातील कवी होता. मात्र, त्याला 10 सुलतानांचे संरक्षण होते.
प्रश्न 3 – जगातील सर्वात उंच सरोवर कोणते आहे?
उत्तर – जगातील सर्वात उंच सरोवराचे नाव ‘टिटिकाका तलाव’ आहे.
प्रश्न 4 – श्रीमद भागवत गीतेचा फारसी भाषेत प्रथम अनुवाद कोणी केला हे तुम्ही सांगू शकाल का?
उत्तर – श्रीमद भागवत गीतेचे फारसीमध्ये भाषांतर सर्वप्रथम दारा शिकोह यांनी केले होते.
प्रश्न 5 – सार्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली? (GK Updates)
उत्तर 3 – SAARC (South Asian Association for Regional Cooperation) ची स्थापना 1985 साली झाली.
प्रश्न 6 – ARMY आणि NAVY चा फुलफॉर्म काय आहे ते सांगा?
उत्तर – वास्तविक, ARMY चा फुलफॉर्म ‘Alert Regular Mobility Young’ आहे, तर NAVY चे पूर्ण रूप ‘Natical Army of Volunteer Yeomen’ आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com