GK Updates : जर कोणी अंतराळात गेला अन् त्याला ढेकर आला तर काय होईल?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना तुमचे (GK Updates) सामान्य ज्ञान चांगले असणे गरजेचे आहे. तुमची IQ लेव्हल खूपचं चांगली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हे प्रश्न एकदा नक्की पहा…

प्रश्न – जर कोणी अंतराळात (Space) गेला अन् त्याला जर ढेकर आला तर काय होईल ?

उत्तर – (GK Updates)

या प्रश्नाच्या उत्तरावर तुमचीही बोलती बंद होईल परंतु या प्रश्नाचं उत्तर खूप सोप्प आहे. तसं पाहिलं तर अंतराळात (Space) गुरुत्वाकर्षण नसतं, त्यामुळे अंतराळात ढेकर येऊच शकत नाहीत. कारण, गुरुत्वाकर्षण नसल्याने अंतराळात पोटातील गॅसपासून लिक्विड वेगळं होतं. त्यामुळे अंतराळात ढेकरचं येऊ शकत नाही.

प्रश्न – असा कोणता जीव आहे, जो एकावेळी 2 हजार फुग्यांएवढा श्वास घेतो अन् तेवढाच सोडतो ?

उत्तर – ब्लू व्हेल हा असा जीव आहे, जो एकावेळी दोन हजार फुग्यांएवढा श्वास घेतो आणि तेवढाच श्वास सोडतो.

प्रश्न – जगातला असा कोणता देश आहे, ज्याचा ध्वज आयाताकृती नाही अन् चौकोनीही नाही ?

उत्तर – जर तुमच्याकडे देश आणि जगाची माहिती असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर सहज देऊ शकता. जर उत्तर येत नसेल तर त्याच उत्तर ‘नेपाळ देश’ आहे ज्याचा ध्वज आयाताकृती नाही अन् चौकोनीही नाही. (GK Updates)

प्रश्न – आपल्या शरीराचा असा कोणता भाग आहे, जिथे रक्ताचा एक अंशही पोहचत नाही?

उत्तर – कॉर्निया (डोळ्याचा पारदर्शक भाग) हा आपल्या शरीरातील एकमेव भाग आहे जिथे रक्तपुरवठा होत नाही. हा एक अवयव आहे जो थेट हवेतून ऑक्सिजन घेतो.

प्रश्न – दात पाहून घोडा आहे की घोडी हे सांगता येईल का ?

उत्तर – हा प्रश्न ऐकून तुम्हाला तर घाम फुटू शकतो. परंतु हे खरे आहे, दात पाहून घोडा आहे की घोडी हे तुम्ही सांगू शकता. घोड्यामध्ये 40 दात आढळतात, तर घोडीमध्ये 36 दात आढळतात.

प्रश्न – इंग्रजीतला असा कोणता शब्द आहे, ज्या शब्दाची (GK Updates) शेवटची चार अक्षरे काढून टाकली तर त्याच्या उच्चारात काही फरक पडणार नाही ?

उत्तर – होय, इंग्रजीला तो शब्द आहे Queue. हा एकमेव शब्द आहे ज्या शब्दाची शेवटची चार अक्षरे काढून टाकल्यानंतर उच्चार सारखाच राहतो, विश्वास बसत नसेल तर तुम्ही उच्चार करून पहा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com