GK Update : या चालू घडामोडी लक्षात ठेवाच.. सरकारी भरती परीक्षेत होईल मोठी मदत

GK Update 22 Aug
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1- पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरी टेनिसमध्ये कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले?
उत्तर- नोव्हाक जोकोविच
2- यामिनी कृष्णमूर्ती यांनी कोणत्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवली?
उत्तर- शास्त्रीय नृत्य (GK Update)
3 – पर्यटन विकास निर्देशांक 2024 अहवालात भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर – ३९ वा

4- केंद्र सरकारने किती राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे?
उत्तर – 8 प्रकल्पांना
5 – राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- १ ऑगस्ट

6- नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर – क्रिकेट
7 – कोणत्या व्याघ्र प्रकल्पात वीज निर्मितीसाठी विंड टर्बाइन बसविण्यात आले आहे?
उत्तर- पेरियार व्याघ्र प्रकल्प
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com