GK Update : जुलै 2024 मध्ये किती लाख कोटी रुपयांचा GST जमा झाला? हे करंट अफेअर्स लक्षात ठेवाच

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – जुलै 2024 मध्ये (GK Update) किती लाख कोटी रुपयांचा GST जमा झाला?
उत्तर- 1.82 लाख कोटी
प्रश्न 2 – जागतिक कृषी निर्यात निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर- 8 वा क्रमांक
प्रश्न 3 – IPEF अंतर्गत पुरवठा साखळी परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – भारत (GK Update)
प्रश्न 4 – कोणत्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चार स्मरणार्थ टपाल तिकिटांचा संच प्रसिद्ध करण्यात आला?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिक 2024

प्रश्न 5 – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 100 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नोहा लायल्स कोणत्या देशाचा धावपटू आहे?
उत्तर- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
प्रश्न 6 – संघ लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर- प्रीती सुदान
प्रश्न 7 (GK Update) – पंजाबचे नवे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर- गुलाबचंद कटारिया

प्रश्न 8- सदो सोन्याची खाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहे ती कोणत्या देशात आहे?
उत्तर- जपान
प्रश्न 9 – कोणत्या केंद्रीय मंत्र्याने राष्ट्रीय शिकाऊ व प्रशिक्षण योजना 2.0 पोर्टल सुरू केले?
उत्तर- धर्मेंद्र प्रधान
प्रश्न 10 – कोणत्या व्याघ्र (GK Update) प्रकल्पात वीज निर्मितीसाठी विंड टर्बाइन बसविण्यात आले आहे?
उत्तर- पेरियार व्याघ्र प्रकल्प
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com