करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1 – रोहन बोपण्णाने टेनिसमधून निवृत्ती (GK Update) जाहीर केली आहे. तो कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर – कर्नाटक
प्रश्न 2 – वैद्यकीय सेवा महासंचालक (सेना) म्हणून नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहे?
उत्तर- साधना सक्सेना नायर
प्रश्न 3 – 2024 चा ‘व्ही व्यंकय्या एपिग्राफी’ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर- व्ही. वेदचलम (GK Update)
प्रश्न 4 – भारत 6 ते 14 ऑगस्ट दरम्यान बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती 2024’ च्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करत आहे?
उत्तर- प्रथम
प्रश्न 5 – पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये बॉक्सिंगमध्ये भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच बनून इतिहास कोणी रचला?
उत्तर- कर्नल कालिबन साई अशोक
प्रश्न 6 – कोणत्या मंत्रालयाने ऑगस्ट 2024 मध्ये युग युगीन भारत संग्रहालयावर राज्य परिषद आयोजित केली आहे?
उत्तर- सांस्कृतिक मंत्रालय
प्रश्न 7- राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- दि. १ ऑगस्ट (GK Update)
प्रश्न 8 – नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर- क्रिकेट
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com