करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न 1 – कोणता देश जगाचे छप्पर म्हणून ओळखला जातो?
उत्तर – तिबेट हा देश जगाचे (GK Update) छप्पर म्हणून ओळखला जातो.
प्रश्न 2 – मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
उत्तर – मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव त्वचा आहे.
प्रश्न 3 – द्विशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण?
उत्तर – मिताली राज दुहेरी शतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
प्रश्न 4 – कोणता साप घरटे बनवत नाही?
उत्तर – किंग कोब्रा घरटे बनवत नाही.
प्रश्न 5 – सापाचे वय किती असते? (GK Update)
उत्तर – सापाचे वय त्याच्या जातीवरून ठरवले जाते जसे कॉर्न साप 5-10 वर्षे जगतात, बॉल अजगर सुमारे 20-30 वर्षे जगतात, किंग साप 12-15 वर्षे जगतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com