करिअरनामा ऑनलाईन। सध्या IT क्षेत्राची प्रचंड गतीनं प्रगती होत (GK Update) आहे. म्हणूनच अनेक IT कंपन्यांनी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचा आणि जगभरातील शहरांमध्ये आपली व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला दिसून येतो. मग यात Google सारखी नामांकित आणि सर्वात मोठी कंपनी मागे कशी असेल? Google नं भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी अधिकाधिक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देणार आहे. पण तुम्हालाही Google सारख्या मोठ्या कंपनीत जॉब हवा असेल तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं तयार ठेवणं आवश्यक असणार आहे. तुमच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी पुढे वाचा….
Google, Apple, Meta, किंवा यासारख्या मोठ्या टेक कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. करिअरची सुरुवात Google सारख्या मोठ्या कंपनीतून करण्याची संधी मिळाली तर ‘सोने पे सुहागा’ म्हणावं लागेल. म्हणूनच आम्ही Google मध्ये मुलाखतीच्या वेळी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची यादी (GK Update) तयार केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नांविषयी.
Google च्या इंटरव्ह्यूमध्ये असे विचारले जातात प्रश्न – (Interview Tips)
1. Microsoft आणि Apple पेक्षा तुम्ही Google ला अप्लाय का केलंत?
2. तुमची आवडती प्रोग्रामिंग भाषा कोणती आहे? आणि तुम्हाला त्या प्रोग्रामिंग भाषेबद्दल काय आवडत नाही?
3. तुमचे आवडते Google प्रोडक्ट कोणते आहे आणि त्याचे कारण काय?
4. Java मध्ये हॅशकोड(#) पद्धत का वापरली जाते?
5. लिनक्स व्हर्च्युअल मेमरी बद्दल माहिती द्या.
6. तुम्ही YouTube सारखे प्रोडक्ट कसे तयार कराल? शेअर करण्यासाठी काही कल्पना आहेत का?
7. प्रोजेक्टमध्ये सोडवण्यासाठी सर्वात कठीण बग कोणता होता आणि तुम्ही तो कसा सोडवला?
हे आणि याशिवाय अनेक सायन्स, मॅथ्स आणि इतर (GK Update) विषयाशी निगडित प्रश्न Google च्या मुलाखतीत विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला कधी Google मध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली तर त्याआधी मुलाखतीला जाताना या प्रश्नांची उत्तरे नक्की तयार ठेवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com