Ghost Writer Job : पगार तब्बल 23 लाख.. काम फक्त पत्र लिहणं…!! कुठे मिळेल ही नोकरी?
करिअरनामा ऑनलाईन । केवळ पत्र लिहिण्यासाठी लाखो रुपयांची (Ghost Writer Job) नोकरी मिळेल; असे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण ही गोष्ट खरी आहे. ही नोकरी स्वप्नवत वाटणारी आहे. सध्या ब्रिटनचा राजा किंग चार्ल्स यांना पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. इंग्रजीत सांगायचं झाल्यास त्यांना ‘घोस्ट रायटर’ची गरज आहे. असा व्यक्ती की जो त्यांना पत्र लिहून देईल. या कामासाठी तुम्हाला लाखो रुपये पगार मिळेल. घोस्ट रायटरचा अर्थ भूताच्या गोष्टी लिहिणारा लेखक नव्हे. चला तर मग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया…
घोस्ट रायटर कोणाला म्हणतात
घोस्ट रायटरचा अर्थ जो व्यक्ती कुण्या एखाद्या व्यक्तीसाठी लिखाण करतो. यात कुण्या दुसऱ्यासाठीही पत्र किंवा पुस्तक लिहिता येते. लिहिणाऱ्याला याचं क्रेडिट दिलं जात नाही. लिहिणारा (Ghost Writer Job) व्यक्ती हा घोस्ट रायटर असतो. याचा अर्थ लिहिणाऱ्याची ओळख समोर येत नाही.
घोस्ट रायटरची गरज का?
ब्रिटनचा राजा किंग चार्ल्सला घोस्ट रायटरची गरज का पडली? याचा अर्थ सरळ आहे किंग चार्ल्स आता ब्रिटनचा राजा झाले आहेत. या पदासोबत बऱ्याच जबाबदाऱ्या येतात. कित्येक (Ghost Writer Job) देशांच्या राजनैतिक, राष्ट्रप्रमुख आणि नेत्यांशी संवाद साधावा लागतो. अनेकदा टेलिफोनवरून बोलावं लागते.
काही ठिकाणी पत्रव्यवहार करणे गरजेचे असते. याशिवाय राजाला पत्र लिहून त्यांची विचारपूस केली जाते. किंग चार्ल्स यांना हजारो पत्र आली आहेत. त्यांना आता त्या पत्रांची उत्तरे द्यायची आहेत.
बंकिंगहॅम पॅलेसमध्ये असेल काम
घोस्ट रायटर पदासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यात नमुद केले आहे की, घोस्ट रायटर म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या व्यक्तीला वर्षाकाठी 23 हजार (Ghost Writer Job) पाऊंड पगार मिळेल. याचा अर्थ भारतीय रुपयांत ही किंमत 23 लाख रुपये होते. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला बंकिंगहॅम पॅलेसमध्ये काम करावं लागेल.
काय असेल काम? (Ghost Writer Job)
या नोकरीसाठी उमेदवाराकडे काही विशेष गुण असले पाहिजेत. त्याला कोणत्याही प्रकारची चूक न करता काम करता आलं पाहिजे. कारण राष्ट्रीय दृष्टिकोणातून महत्त्वाच्या (Ghost Writer Job) विषयांवर पत्र लिहावे लागणार आहे. आलेल्या पत्रांची उत्तर द्यावी लागणार आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com