करिअरनामा ऑनलाईन । जगभरात नोकरीसाठी स्पर्धा वाढली आहे. कोणतीही (General Knowledge) प्रायव्हेट कंपनी असो की सरकारी संस्था नोकर भरतीच्यावेळी परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी कंपनीत असलेल्या पोस्टनुसार प्रश्न विचारले जातात. त्यात जर सरकारी नोकरी असेल तर त्यात गणित (Maths), विज्ञान (Science), मेंटल स्किल्स (Mental Skills) बरोबरच सामान्य ज्ञानाबद्दलही (General Knowledge) प्रश्न विचारले जातात. मात्र अनेकदा विद्यार्थी इतर विषयांत चांगले गुण मिळवूनही सामान्य ज्ञानात मार्क्स मिळवू शकत नाहीत. याचं प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीनं केलेला अभ्यास आणि ज्ञानाची कमतरता. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला जनरल नॉलेजचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा हे सांगणार आहोत.
आतंरराष्ट्रीय न्यूज पेपर वाचणं आवश्यक (General Knowledge)
जगभरात हजारो प्रादेशिक वृत्तपत्र आहेत पण यामध्ये केवळ त्याच्या सभोवतालच्या घटनांशी संबंधित बातम्या आढळतात जे पुरेसं नाही. म्हणून GK वाढवण्यासाठी इंग्रजी आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर (International News Paper) वाचणं आवश्यक आहे. हे वृत्तपत्र दररोज सविस्तर वाचलं पाहिजे. यामुळे नक्कीच तुमचं GK वाढण्यास मदत होईल.
GK चं पुस्तक वाचा
आपले ज्ञान विस्तृत करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे वाचन. GK वाढवण्यासाठी आपण विविध विषयांवरील पुस्तकं वाचणे महत्त्वाचं आहे. बुक्स स्टोअरमध्ये (General Knowledge) हजारो GK पुस्तकं (GK books) उपलब्ध असतात इथून तुम्ही आवडीपैकी कोणतंही एक निवडू शकता आणि सामान्य ज्ञानाचं पुस्तक वाचण्यास सुरुवात करू शकता.
दररोज इंग्रजी बातम्या ऐका
दररोज किमान अर्धा तास इंग्रजी बातम्या ऐका. दररोज इंग्रजी बातम्या ऐकल्यामुळे आपल्या GK मध्ये सुधारणा होईल. तुमची स्मरणशक्ती देखील सुधारेल. तुम्ही (General Knowledge) कोणत्याही चॅनेल किंवा रेडिओवरील बातम्या ऐकू शकता कारण हा बातम्यांचा सर्वोत्तम स्रोत आहेत.
Quiz आणि GK टेस्ट द्या
वृत्तपत्र किंवा वेबद्वारे दरमहा किमान एक GK टेस्ट द्या. बरेच क्विझ आणि GK गेम्स या स्वरुपात देखील उपलब्ध आहेत जे खेळत असताना आपण बऱ्याच (General Knowledge) गोष्टी शिकु शकतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com