Free Courses : UGC चं तरुणांना सरप्राईज!!! एक, दोन नव्हे… तब्बल 23,000 निरनिराळे कोर्सेस मिळणार मोफत; पहा कसं

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। करिअरच्या मागे धावणारा तरुण वर्ग नेहमीच नाविन्याचा शोध घेत (Free Courses) असतो. देशभरातील तरुण हे फ्रि कोर्सेस कोणत्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत का हे सर्च करत असतात. तसंच फ्री कोर्सेसमुळे जॉब मिळत नाही अशी सुद्धा तक्रार ही लोकं करत असतात. मात्र आता UGC नं देशभरातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे.

UGC नवीन पोर्टल सुरु करणार

विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC आता 23 हजारांहून अधिक उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी नवीन वेब पोर्टल सुरू करणार आहे. याअंतर्गत या अभ्यासक्रमांमध्ये मोफत शिक्षण मिळणार आहे. यूजीसीने म्हटले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि मुलांची काळजी यासह विविध अभ्यासक्रम आता नवीन वेब पोर्टलवर (Free Courses) विनामूल्य उपलब्ध असतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त एक नवीन पोर्टल लॉन्च केले जाईल, ज्याचा उद्देश डिजिटल अंतर भरून काढणे आणि देशाच्या दुर्गम भागात उच्च शिक्षणाची पोहोच वाढवणे हा आहे.

आगामी शैक्षणिक सत्र 2022-2023 पासून हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी UGC ने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी करार केला आहे. मंत्रालयाच्या अंतर्गत 7.5 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) आणि स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) केंद्रे कार्यरत आहेत.

या कोर्सविषयी बोलताना UGC चे अध्यक्ष एम.जगदेश कुमार म्हणाले, “उच्च शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, UGC विद्यार्थ्यांना इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये डिजिटल संसाधने उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. नागरिकांना, विशेषत: ग्रामीण भारतात राहणाऱ्यांना त्यांच्या दारात डिजिटल प्रवेश आणि ई-गव्हर्नन्स सेवा प्रदान करणे हा CSC चा उद्देश आहे.”

सर्व कोर्स असतील अगदी फ्री!! (Free Courses)

या पोर्टलवर 23 हजारांहून अधिक उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम मोफत उपलब्ध असतील. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये 23,000 पदव्युत्तर अभ्यासक्रम, उदयोन्मुख क्षेत्रातील 137 ‘स्वयम’ सर्वसमावेशक ऑनलाइन खुले अभ्यासक्रम आणि 25 गैर-अभियांत्रिकी ‘स्वयम’ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी UGC पोर्टलवर कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com