Foxconn Recruitment : कामाची बातमी!! IPhone तयार करणारी फॉक्सकॉन भारतात करणार मोठी भरती 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ॲपल ची सर्वात मोठी पुरवठादार (Foxconn Recruitment) असलेल्या फॉक्सकॉन कंपनीने भारतात त्यांची कर्मचारी संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या भारतातील प्रतिनिधीने त्याच्या लिंक्डइन अकाऊंटवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. फॉक्सकॉनचे भारतातील प्रतिनिधी व्ही ली यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७३व्या वाढदिनी शुभेच्छा देताना ही घोषणा केली. तैवान येथील आयफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉनच्या तामिळनाडू येथील प्लांटमध्ये आधीपासूनच ४० हजार कर्मचारी काम करत आहेत. आता ली यांनी कर्मचारी संख्या दुपटीने वाढविण्याची घोषणा केली आहे. पण त्यांनी नेमकी किती कर्मचारी भरती करणार याचा निश्चित आकडा सांगितलेला नाही.

फॉक्सकॉन ही सध्या जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी आहे. या कंपनीसाठी भारत ही एक वेगाने वाढणारी आणि मोठी बाजारपेठ आहे. यामुळे त्यांनी भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये उत्पादन सुविधांचा झपाट्याने विस्तार केला आहे. फॉक्सकॉन चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी बिघडलेले भू-राजकीय वातावरण कारण आहे. आता ते भारतात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत.
गेल्या वर्षीच्या अखेरीस रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, फॉक्सकॉनने पुढील दोन वर्षांमध्ये आणखी ५३ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची आणि भारतात सुमारे ७० हजार पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची योजना आखली आहे. भारत सरकारच्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले होते.

ऑगस्टमध्ये कर्नाटकने घोषणा केली होती की Foxconn राज्यातील (Foxconn Recruitment) दोन प्रकल्पांमध्ये ६०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. हे प्रकल्प आयफोनसाठी केसिंग कंपोनंट्स आणि चिप उत्पादनासाठी उपकरणे तयार करणार आहेत.
या थेट नोकऱ्यांव्यतिरिक्त, स्मार्टफोन निर्माते पुढील 12 ते 24 महिन्यांत 80,000 ते 1,00,000 नोकऱ्या निर्माण करतील अशी अपेक्षा आहे. या अहवालात असे म्हटले आहे की आघाडीचे मोबाइल ब्रँड, त्यांचे पुरवठादार आणि असेंब्ली पार्टनर भारतात उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहेत आणि त्यामुळे नोकऱ्या वाढणार आहेत. फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन सारख्या अॅपल स्मार्टफोन निर्मात्यांसोबत, डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स सारख्या इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपन्या देखील त्यांचे मनुष्यबळ वाढवण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com