Flipkart Job : Flipkart ने दिली खुषखबर!! लवकरच देणार 1 लाखाहून अधिक नोकऱ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नावाजलेली ई-कॉमर्स कंपनी (Flipkart Job) फ्लिपकार्टने नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात 1 लाखांहून अधिक तात्पुरते रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टय कंपनीने ठेवले आहे. कंपनीची मागणी पूर्ण करण्यासाठी ही भरती त्यांच्या पुरवठा साखळीत केली जाईल; असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे. फ्लिपकार्टने निवेदनात म्हटले आहे की, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारामध्ये स्थानिक किराणा पुरवठा भागीदार आणि महिलांचा समावेश असेल. यामध्ये अपंग व्यक्तींना (PWD) देखील काम दिले जाईल. सणासुदीच्या आधी पुरवठा साखळीत एक लाखाहून अधिक नवीन रोजगार संधी निर्माण करण्याची कंपनीची अपेक्षा आहे.

फ्लिपकार्ट समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत बद्री म्हणाले; “बिग बिलियन डेजची विक्री प्रचंड आहे आणि भारताच्या नाविन्यपूर्णतेवर आणि इकोसिस्टमवर परिणाम करते. यामुळे लाखो नवीन ग्राहकांना ई-कॉमर्सच्या चांगुलपणाचा अनुभव घेण्याची संधी मिळते. Flipkart TBBD सेल दरम्यान टॉप (Flipkart Job) ब्रँड्सच्या उत्पादनांवर सूट देते. TBBD दरम्यान, आम्हाला क्षमता, स्टोरेज, प्लेसमेंट, पॅकेजिंग, एचआर, प्रशिक्षण, वितरण आणि पूर्ण पुरवठा साखळी वाढवण्याची गरज आहे;” असंही बद्री म्हणाले. या वर्षी कंपनीने तिच्या किराणा वितरण कार्यक्रमाद्वारे 40 टक्क्यांहून अधिक शिपमेंट वितरित करण्याची योजना आखली आहे.

कंपनीने सांगितले की, या वर्षी फ्लिपकार्टने (Flipkart Job) उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये 1.9 दशलक्ष चौरस फूट जागा जोडली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com