अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रश्नसंचाऐवजी सराव चाचणीची सुविधा उपलब्ध

करिअरनामा ऑनलाईन । अंतिम वर्ष परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना ही पद्धत समजण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रश्नसंच देण्याची सूचना विद्यापीठांना केली आहे.मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रश्नसंचाऐवजी सराव चाचणीची सुविधा दिली जाणार असून , परीक्षेपूर्वी ५ ते ६ दिवस आधी सराव चाचणीची सुविधा उपलब्ध होईल.

विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची, १ तास वेळाची आणि ५० गुणांची घेतली जाणार आहे. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती नेमण्यात आली आहे. प्रत्येक विषयाचा प्रश्नसंच तयार करण्यात येणार आहे.त्यातील साठ प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारले जातील.सरावासाठी प्रश्नसंच कधी मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.मात्र विद्यापीठाकडून सराव चाचणी दिली जाणार आहे.

विद्यापीठाचे प्रा.कुलगुरू डॉ.एन. एस. उमराणी म्हणाले, ‘विद्यापीठाकडून ऑनलाईन सराव चाचणीची  सुविधा दिली जाणार आहे.परीक्षेपूर्वी पाच ते सहा दिवस आधी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com