मराठा समाजाला शैक्षणिक शुल्कासह दिलेल्या इतर सवलती कायम राहतील; अशोक चव्हाण

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असले तरी, महाराष्ट्र शासनाने मराठा विद्यार्थ्यांना दिलेल्या सवलती ज्यामध्ये, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, वसतिगृहाच्या संदर्भात दिलेल्या सुविधा आणि वसतिगृह प्रवेश आरक्षण यापुढेही कायम राहतील. यासोबतच, महाराष्ट्र शासन नोकरभरतीचाही लवकरात लवकर निर्णय घेईल असे मराठा आरक्षण समिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुविधा परत घेतल्या जातील का? त्यांना मिळालेले शुल्कात सवलत ही परत वसूल केली जाणार का? तसेच आरक्षणातून मिळालेले वसतिगृह आता सोडावे लागणार का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते. याचे या स्पष्टीकरणामुळे गैरसमज आणि शंका मिटल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रमध्ये नोकरभरती रखडली आहे. सध्या उपसचिव हे विभागनिहाय आढावा घेत असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर नोकर भरती विषयी निर्णय घेण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp 

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.