करिअरनामा ऑनलाईन । 10वी आणि 12वीतील मुलांच्या परीक्षा (Exam Diet Plan) फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होत आहेत. सर्वसाधारणपणे परीक्षेच्या आधी, आणि परीक्षा सुरु असताना मुलं एकाच ठिकाणी सतत बसून अभ्यास करत असतात. शरीराची अजिबात हालचाल होत नाही. अभ्यास करताना खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत असते. अपुरी झोप, अनियमित आहार यामुळे शरीरावर आणि अभ्यासावर विपरीत परिणाम होताना दिसतात. अशावेळी मुलांनी अभ्यास, झोप आणि आहाराची सांगड कशी घालायची; याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
1. मुले अभ्यासासाठी रात्री जागरण करतात, सतत बसून असतात, ताणामुळे काही मुले खूप खा-खा करतात, तर काही अजिबात खात नाहीत.
2. रात्री जागरण करताना चहा-कॉफीसारखी पेये जास्त प्रमाणात घेतात, चिप्स, बिस्किटे, न्यूडल्ससारखे जंक प्रमाण वाढते, पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते.
3. रोजच्या रोज नैसर्गिक प्रातर्विधीसाठी टाळाटाळ करतात, अपूर्ण आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. (Exam Diet Plan)
4. नैराश्य, अतिरिक्त ताण वाढीस लागतो.
वरील सर्व गोष्टीमुळे मुलांना दमल्यासारखे, थकून गेल्यासारखे वाटते. काही मुलांना चक्कर किंवा ग्लानी येते. स्मरणशक्ती कमी होते. सर्दी-पडसे, ताप यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागते. चुकीचे अन्न चुकीच्या वेळेस खाल्यामुळे पचनशक्ती मंदावते व अॅसिडिटी, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, किंवा शौचास पातळ होणे, तोंडाला चव नसणे यांसारखे विकार उद्भवतात.
ताणतणावात मेंदू आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पुढील गोष्टी फॉलो करा –
1. नियमित अंतराने व थोडे थोडे खावे. पचन चांगले होऊन शरीरास आवश्यक असे घटक मिळतील, तेलकट, शिळे पदार्थ यांचा वापर टाळा.
2. दिवसाची सुरवात फळे किंवा सुकामेव्याने करा.
3. दिवसभरात किमान तीन महत्त्वाची खाणी- म्हणजेच सकळचा नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण नक्की घ्या.
4. प्रथिनांमुळे शरीराची झीज भरून निघते. म्हणून डाळी, उसळी, अंड्यातले पांढरे, मासे, सुकामेवा इत्यादी सेवन करावे.
5. आहारामध्ये चोथायुक्त पदार्थांचा समावेश करावा. उदाहरणार्थ, अंजीर, पपई, चिक्कूसारखी फळे, पालेभाज्या, काकडी, गाजर, बीट इत्यादी.
6. रोगप्रतिबंधक शक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्त्व क मिळण्यासाठीआवळा, लिंबू, संत्री-मोसंबी, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करावा.
7. ॲसिडिटी, गॅससारखे अपचन होऊ नये म्हणून नारळ पाणी, ताक, लिंबूपाणी, सालासकट फळे यांचे सेवन करावे व चहा किंवा कॉफीसारखी पेये टाळावीत.
8. हिमोग्लोबीनच्या कमतरतेने मुलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, त्यांना थकवा जाणवतो, म्हणून आहारामध्ये पालेभाज्या, काळ्या मनुका, सुके अंजीर, अळीव, शेंगदाणे, गूळ, खजूर यांचा समावेश करा.
9. ताणाशी मुकाबला करण्यासाठी अँड्रेलाइन संप्रेक महत्त्वाचे असते. जीवनसत्त्व क, अ, बी कॉम्प्लेक्स इत्यादी अँड्रेलाइन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी मदत करतात. म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या व फळे यांवे सेवन करा.
10. कमी पाण्याच्या सेवनामुळे मळमळ होणे, गोंधळल्यासारखे होणे, थकवा येणे असे होऊ शकते. म्हणून दिवसभरात दहा-बारा ग्लास पाणी प्यावे व त्याचबरोबर ताक, सूप, लिंबूपाणी, नारळाचे पाणी यांचे सेवन करावे.
परीक्षाकाळात अशी ठेवा दिनचर्या –
1. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले आठ बदाम, एक मनुका सकाळी उठल्यावर घ्या.
2. किमान अर्धा तास हलका व्यायाम करा.
3. नाश्ता – दूध- हळद आणि ताजा नाश्ता. त्यात उसळ, पनीर, अंड्यातले पांढरे यांचा समावेश करावा.
4. जेवणामध्ये कोशिंबीर, डाळ/उसळ, भात/चपाती किंवा भाकरी, भाजी यांचा समावेश करावा. सालासकट फळे चावून खावीत.
5. जंकफूड, तेलकट पदार्थ, मैदायुक्त पदार्थ टाळावेत.
6. दिवसभरात दहा-बारा ग्लास पाणी प्यावे.
7. दोन जेवणांच्या मध्ये भूक लागल्यास गुडदाणी, सुका मेवा, राजगिरा लाह्या यांचा वापर करावा.
8. सहा-सात तासाची शांत झोप घ्यावी. योग, प्राणायामसारखे श्वसनाचे व्यायाम करून तणाव दूर करावा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com